Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमावबंदीचे आदेश म्हणजे प्रशासनाला ‘उशिरा सुचलेलं शहाणपण’; जिल्हा परिषद निवडीवरून शशिकांत शिंदेंचा कडाडून हल्ला

Shashikant Shinde News: शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद निवडीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर टीका केली. शेतकरी मदत आणि पोटनिवडणुकीबाबत त्यांनी मांडलेली सविस्तर भूमिका वाचा

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 03, 2026 | 09:43 PM
जिल्हा परिषद निवडीवरून शशिकांत शिंदेंचा प्रशासनावर कडाडून हल्ला (Photo Credit- X)

जिल्हा परिषद निवडीवरून शशिकांत शिंदेंचा प्रशासनावर कडाडून हल्ला (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • जमावबंदीचे आदेश म्हणजे प्रशासनाला ‘उशिरा सुचलेलं शहाणपण’
  • जिल्हा परिषद निवडीवरून शशिकांत शिंदेंचा प्रशासनावर कडाडून हल्ला
सातारा दि ३ (प्रतिनिधी): सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सभापती निवडी वेळी जमावबंदी लागू केली आहे हे उशिरान सुचलेलं शहाणपण आहे. बैल गेला आणि झोपा केला अशी त्यांची अवस्था आहे. सरकारी तिजोरीतून अमिष दाखवून निवडणुका आणि सदस्य जिंकण्याचा नवीन फंडा सुरू झाला आहे. यावेळी प्रशासनाची भूमिका नक्की काय आहे हे सुद्धा तपासावे लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद सभापती निवडी वेळी जमावबंदी लागू केली आहे हे उशिरान सुचलेलं शहाणपण आहे. सभापती निवडीवेळी तरी सीसीटीव्ही व्यवस्थित चालू आहेत का बघावे लागतील. सीसीटीव्ही बंद होते पण सभेच्या वेळी तरी सभेचे चित्रीकरण झालं आहे का हे मला विचारायचं आहे. एका उमेदवाराने हात वर केला नसताना त्याचे मतदान गृहीत धरले ही अक्षम्य चूक आहे. हा पक्षपाता (पार्सिलिटी) चा प्रकार आहे. या सभेचे चित्रीकरण आणि सीसीटीव्ही चित्रीकरण आम्ही मागतोय ते जर मिळालं नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आहोत. उद्या होणारी सभापती निवड तरी लोकशाहीच्या माध्यमातून व्हावी ती लोकशाहीची थट्टा होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार भाजपने स्वतःकडे घेतला तर त्याला लगेच चार-पाच कोटींची कामे कशी मिळतात. सरकारी तिजोरीतून अमिष दाखवून निवडणुका जिंकण्याचा नवीन फंडा सुरू झाला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात हे घडतंय हे दुर्दैवी आहे. हा पैशाचा बाजार त्यांनाच लखलाभ, मात्र जनता याबाबत नक्कीच विचार करेल.यावेळी तरी लोकशाही पद्धतीने निवडणूक व्हावी आणि सदस्यांनी निर्भीडपणे आपलं मत द्यावे असेही शिंदे म्हणाले.

खरात प्रकरणात जर एखाद्या कोणी गुन्हा केला असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र पीडित महिले वर कारवाई करणे योग्य नाही. मात्र जे जे कोणी यात सहभागी असतील त्याच्यावर कारवाई व्हावी. विशेष तपास  पथका (एसआयटी)च्या तपासात अनेक गोष्टी पुढे येतात. मग त्यात हवाला चा विषय असो,त्याचा सीए चे नाव देखील आले आहे. या माध्यमातून कुठे कुठे पैसा जमवला आणि गुंतवला. कायदेशीर गुंतवला की बेकायदेशीर गुंतवला. या सगळ्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे आणि कारवाई देखील होणं गरजेचं आहे.

महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संसदेत एकट्याच गेल्या त्यांच्यासोबत नेते मंडळी नव्हती याविषयी विचारले असता शिंदे म्हणाले, सूत्रांच्या माहितीप्रमाणे आम्हाला देखील बरीच माहिती मिळते आहे. पण आत्ताच त्यावर बोलणं योग्य नाही. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या दिल्लीला गेल्या होत्या. त्याचे इतर नेतेमंडळी त्यांच्यासोबत का नव्हते याची मला कल्पना नाही. त्यांनीच उत्तर दिलं की, कोण कधी येतं कधी जातं याची पत्रकारांना कल्पना असेल. मात्र त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही.

बारामती पोट निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आमच्या पक्षाने निर्णय घेतला की त्या ठिकाणी उमेदवार द्यायचा नाही. राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने उमेदवार देणार असल्याचे समजते आहे. याबाबत काँग्रेस पक्षाच्या प्रांत अध्यक्ष यांच्याबरोबर चर्चा करेन कारण या दोन्ही जागा ह्या राष्ट्रवादीच्या आहेत. त्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ. राज्यसभेच्या वेळी देखील अनेक जण इच्छुक असतात मग आम्ही चर्चा करून त्यातून मार्ग काढतो. यावेळी देखील चर्चा करून मार्ग काढू असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.

अवकाळी पावसाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. आकस्मिक निधीतून , मदत आणि पुनर्वसन निधीतून तरतूद कमी केलेली दिसते आहे. या सरकारच्या धोरणाला आम्ही विधिमंडळात आक्षेप देखील घेतला होता. दुर्दैवी बाब म्हणजे शासनाकडून अनेक बाबी लपवल्या जात आहेत. केंद्र सरकारकडून मिळणारी २५ हजार  कोटी रुपयांची मदत मिळालीच नाही. केंद्राकडून मदत नाही मिळाली तरी राज्य सरकारकडून आम्ही मदत पोहोचवली आहे असं मंत्र्यांकडून सांगितलं जातंय. विमा कंपन्यांवर आमचा आक्षेप आहे. वेळेवर पंचनामे होत नाहीत.

केंद्रीय पथक देखील सर्व काही संपल्यानंतर येतं हे दुर्दैवी आहे. तत्काळ मदत जाहीर करणे गरजेचे आहे. पंचनामे नंतर करा. कर्जमाफीच्या बाबतीत घेतलेला निर्णय हा फसवा आहे. निवडणुकी वेळी मत घ्यायची निवडणूक झाली की सौरऊर्जा माथी मारायची, विजेच्या बाबतीत आणि कर्जमाफीच्या बाबतीत अडचणी निर्माण करायच्या. ज्याच्याकडे घर आणि गाडी आहे त्याला कर्जमाफी मिळणार नाही अशी माहिती मला मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांचा यलगार पाहायला मिळेल असेही शिंदे म्हणाले.

‘महापालिकेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ असे अजितदादा म्हणाले होते’; ‘या’ नेत्याने केला मोठा दावा

Web Title: Shashikant shinde criticizes satara collector zp election farmer loan waiver updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 09:42 PM

Topics:  

  • Satara
  • Satara ZP Election
  • Shashikant Shinde

संबंधित बातम्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला! ‘या’ दिवशी होणार मतदान; प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर
1

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला! ‘या’ दिवशी होणार मतदान; प्रशासनाकडून कार्यक्रम जाहीर

Pinewood School Panchgani: पाचगणीतील ‘पाईनवुड स्कूल’ची मान्यता का रद्द होणार? शिक्षणाधिकाऱ्यांच्या धडक शिफारशीचे कारण काय?
2

Pinewood School Panchgani: पाचगणीतील ‘पाईनवुड स्कूल’ची मान्यता का रद्द होणार? शिक्षणाधिकाऱ्यांच्या धडक शिफारशीचे कारण काय?

Satara News: निशांत पाटील हाजीर हो…… भाजपाचा पहिला नगरसेवक गळाला, अपात्रतेप्रकरणी २ जूनला सुनावणी
3

Satara News: निशांत पाटील हाजीर हो…… भाजपाचा पहिला नगरसेवक गळाला, अपात्रतेप्रकरणी २ जूनला सुनावणी

Mhaswad News: गतीरोधकाचा प्रश्न हवेतच, विरला सोशीक जनतेची आभाळभर सहनशीलता
4

Mhaswad News: गतीरोधकाचा प्रश्न हवेतच, विरला सोशीक जनतेची आभाळभर सहनशीलता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.