Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, आता महामंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीही रद्द

विरोधी पक्षाच्या या मागणीनंतरही शिंदे सरकारने जिल्हा वार्षिक योजना, राज्यस्तरीय योजना, आदिवासी विकास उपयोजना, विशेष घटक योजनेतील मंजूर झालेली व निविदा स्तरावर असलेल्या सर्व योजनांच्या कामांना सोमवारी एक आदेश काढून स्थगिती दिली.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 19, 2022 | 09:50 PM
शिंदे सरकारचा मोठा निर्णय, आता महामंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीही रद्द
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात १ एप्रिल २०२२ पासून जिल्हा वार्षिक योजना, राज्यस्तरीय योजना, आदिवासी विकास उपयोजना तसेच विशेष घटक व अन्य योजनांमध्ये मंजूर झालेल्या पण निविदा न काढलेल्या कामांच्या अंमलबजावणीस शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. त्याचसोबत विविध महामंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. याबाबत सोमवारीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी केली होती.

विरोधी पक्षाच्या या मागणीनंतरही शिंदे सरकारने जिल्हा वार्षिक योजना, राज्यस्तरीय योजना, आदिवासी विकास उपयोजना, विशेष घटक योजनेतील मंजूर झालेली व निविदा स्तरावर असलेल्या सर्व योजनांच्या कामांना सोमवारी एक आदेश काढून स्थगिती दिली. यासोबतच प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत असणारे उपक्रम, महामंडळ, मंडळ, समित्या, प्राधिकरणे यावर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अशासकीय सदस्य यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेशही काढण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या योजनांना स्थगिती देण्यात येत असल्याचे राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी आदेशात नमूद केले असून मंत्रालयातील सर्व खात्याच्या सचिवांना तसे कळविले आहे.

Web Title: Shinde governments big decision now the appointment of non government members on the corporation is also cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2022 | 09:50 PM

Topics:  

  • Big Decision
  • BJP
  • Nationalist Congress Party
  • Shinde government

संबंधित बातम्या

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
1

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस
2

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी
3

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत
4

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.