Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी

Chiplun : चिपळूण भाजपचे ग्रामीण तालुकाध्यक्ष उदय घाग यांनी जिल्हा नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला. राजीनामापत्रात संघटनात्मक कामकाजाबाबतची खंत व्यक्त केली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 13, 2026 | 06:25 PM
Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी

Follow Us
Follow Us:
  • घाग यांची पक्ष नेतृत्त्वावर नाराजी
  • निर्णय प्रक्रियेत मतांना महत्त्व मिळत नसल्याचा आरोप
  • वैयक्तिक स्वार्थातून राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट
 

चिपळूण (Chiplun) भाजपचे ग्रामीण तालुकाध्यक्ष उदय घाग यांनी जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सुपूर्द केला. आता या राजीनाम्यावर जिल्हाध्यक्ष कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

घाग यांनी दिलेल्या दिलेल्या राजीनामापत्रात गेल्या काही काळापासून पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना माझ्या पदाची व जबाबदारीची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची भावना निर्माण झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

मनात तीव्र नाराजी

घाग आपल्या राजीनामा पत्रात म्हणतात की, पक्षाच्या संघटनात्मक कामामध्ये प्रामाणिकपणे वेळ देऊन, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. मात्र काही निर्णयप्रक्रिया व संघटनात्मक बाबींमध्ये स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मतांना अपेक्षित महत्त्व मिळत नसल्यामुळे माझ्या मनात तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे त्यात नमूद केले आहे.

पक्षाच्या हितासाठी अनेक वेळा परिस्थितीशी जुळवून घेत काम केले; मात्र सध्याच्या परिस्थितीत तालुकाअध्यक्ष म्हणून माझ्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्ष, चिपळूण पश्चिम या पदाचा राजीनामा स्वेच्छेने सादर करीत आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana Protest: पुणे-बंगळूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी रस्त्यावर

निर्णय वैयक्तिक स्वार्थातून नाही

माझा हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक स्वार्थातून नसून, पक्ष संघटनेतील सध्याच्या परिस्थितीबद्दलची माझी नाराजी आणि मनातील खंत व्यक्त करण्यासाठी घेतलेला आहे. पक्षाने या बाबींचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा उदय घाग यांनी आपल्या राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे.

पक्षाने आजपर्यंत माझ्यावर दाखविलेला विश्वास, तसेच सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेले सहकार्य याबद्दल मी मनःपूर्वक आभारी असल्याचेही त्यांनी म्हटल आहे. माझा राजीनामा स्वीकारून मला सदर पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी ही विनंती या राजीनामा पत्रात करण्यात आली आहे.

Gopichand Padalkar यांना मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा अर्ज अवैध; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार?

Web Title: Chiplun bjp taluka president uday ghag resignation rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • BJP
  • Chiplun
  • political leaders

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत
1

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल
2

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
3

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
4

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.