Shinde Sena aggressive against Prithviraj Chavan
Shinde Sena aggressive against Prithviraj Chavan: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती, त्यानंतर त्यांच्या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते यांनीदेखील तशाच शब्दांत प्रत्युत्तर दिले होतं. यानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘भगवा दहशतवाद’ संबंधित विधानावरून शिंदे गटाने तीव्र आक्षेप घेतला आहे. शनिवारी शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे दादरमधील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं.
या आंदोलनामध्ये ‘हिंदूंचा अपमान खपवून घेतला जाणार नाही’ अशा घोषणा देत काँग्रेसविरोधात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. शिंदे गटाने आरोप केला की, चव्हाण यांचं वक्तव्य हिंदू धर्म, भगवा आणि राष्ट्रवादाचा अपमान करणारे आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “भगवा, हिंदू आणि राष्ट्रवाद हे एकमेकांशी जोडलेले असून, यावर टीका करणे म्हणजे हिंदूंच्या भावना दुखावण्यासारखं आहे. काँग्रेसने याबाबत माफी मागावी.”पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या वक्तव्यात, “’भगवा दहशतवाद’ हा शब्द वापरणं चूक होतं, पण भगवा, हिंदुत्व आणि सनातन हे एकसारखे नाहीत,” असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावरूनच राजकीय वातावरण तापलं आहे.
‘काँग्रेसने तयार केलेलं हिंदी टेरर आणि भगवा आतंकवाद अशा प्रकारचे नॅरेटिव्ह पूर्णपणे बस्ट झालं आहे. वोट बँकेच्या राजकारणासाठी या शब्दांचा वापर केला गेला. इस्लामिक दहशतवादाच्या काळात हिंदूंनाच आतंकवादी ठरवण्याचे हे षडयंत्र होतं,’ अशी टिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. तर फडणवीसांच्या या टिकेला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, ‘भगवा दहशतवाद हा शब्दच मुळात चुकीचा होता. आजही तो वापरला जाऊ नये, अशी माझी भूमिका आहे. मात्र भगवा, हिंदुत्तव आणि सनातन हे एक नाही. मी मुख्यमंत्री असताना सनातनवर बंगी आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यासंदर्भात माझ्या पोलिसांनी मला हजारो पानांचे पुरावेही दिले होते. त्यामुळे हे एकच आहे, ज्याला माझा पूर्ण विरोध आहे. भाजप आणि आरएसएस आल्यावर भगवा आला का, ‘असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
Sanjay Raut News: धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपार्या…; यवतच्या दंगलीवर संजय राऊतांचा भाजपवर पुन्हा
त्याचवेळी मंत्री प्रतापराव सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनीदेखील ट्विटर एक्सवर ट्विट करत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.”तोंड सांभाळून बोला पृथ्वीराज चव्हाण साहेब! सनातन धर्म हा आमचा अभिमान आहे – भगवा शिवरायांचा, आमच्या शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा आणि वारकऱ्यांचा स्वाभिमान आहे ! सनातन धर्माला दहशतवाद म्हणणारे तुमच्यासारखे लोक मानसिक दिवाळखोर आहेत! स्वतःचे नाव बदलून महंमद घोरी ठेवा – हे नाव तुम्हाला शोभत नाही ! तुमची राजकीय सुंता झाली असेल, पण आमचे रक्त भगवे आहे ! उद्या युवासेना याला उत्तर देणार, शिवसेना स्टाईलने, थेट आणि ठणकावून! आगे आगे देखो होता है क्या,” असं म्हणत त्यांनी इशाराही दिला आहे.