वाकड्यात काम करण्यासाठी तुम्हाला कृषीमंत्री पद दिलेलं नाही; दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यावरुन रोहित पवारांची टीका
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली जात होती. त्यानंतर त्यांच्याकडे असलेले कृषी खाते दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले. तर मंत्री भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा खाते कोकाटे यांना दिले गेले आहे. कृषिमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच दत्तात्रय भरणे यांनी एक विधान केले. त्यावरून आता आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कृषिमंत्री नवीन काय म्हणाले तर वाकडी कामं पण सरळ करावी लागतात. यांनी-त्यांनी महाराष्ट्राची तिजोरी वेडीवाकडी केली आहे. वाकड्यात काम करण्यासाठी कृषिमंत्री पद दिलं नाही. सरळ काम करणाऱ्यांच्या मी पाठीशी राहतो. वाकडं काम जर तुमच्या हातून झालं तर महाराष्ट्र माफ करणार नाही. आम्ही तुम्हाला माफ करणार नाही’.
तसेच पुण्यातून अनेक कंपन्या जात आहे. तळेगाव, चाकण या परिसरातील कंपन्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर व्यासपीठावर दादागिरी असे म्हणत असतील तर तुम्ही काय करत आहात असा प्रश्न निर्माण होतो. पुण्यातील एमआयडीसीमध्ये दादांची दादागिरी आहे का? दादाच्या पक्षाचे दादागिरी आहे की भाजपची दादागिरी आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांची दादागिरी आहे, हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला दादागिरी करता याची लवकरात लवकर नावं जाहीर करावी, अशी मागणीही केली.
देवेंद्र फडणवीस यांना सगळं माहीत असताना…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना सगळं माहीत असताना सगळ्या कंपन्या गुजरातला जात असतील तर भूमिका कदाचित भाजपची असावी. कृषिमंत्री नवीन काय म्हणाले तर वाकडी कामं पण सरळ करावी लागतात. यांनी-त्यांनी महाराष्ट्राचे तिजोरी वेडीवाकडी केली आहे, वाकड्यात काम करण्यासाठी कृषिमंत्री पद दिलं नाही. सरळ काम करणाऱ्यांच्या मी पाठीशी राहतो, वाकड काम जर तुमच्या हातून झालं तर महाराष्ट्र माफ करणार नाही आम्ही तुम्हाला माफ करणार नाही.
पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढताहेत
पुण्याचे आयुक्त येऊन भंपकबाजी करत आहे. कोयता गॅंग तोडफोड घटना वाढल्या आहेत. आयुक्तांचं पुण्याकडे दुर्लक्ष आहे. अजित पौराणिक शिंदे यांच्या पक्षाला अडचणीत आणण्याचे काम पुणे पोलिस आयुक्त करत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था परिस्थिती अतिशय बिकट आहे, अशी टीकाही त्यांनी केली.