Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrikant Shinde : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज; राज्यभर 288 मतदारसंघांत BLA नियुक्तीवर भर

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात मतदार यादी पुनरीक्षण मोहीम जाहीर केल्यानंतर Shiv Sena ने राज्यभर बूथ लेव्हल एजंट (BLA) नियुक्ती मोहीम वेगाने सुरू केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 18, 2026 | 06:33 PM
मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज, सव्वा लाख बीएलए नियुक्त

मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज, सव्वा लाख बीएलए नियुक्त

Follow Us
Follow Us:
  • मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज, सव्वा लाख बीएलए नियुक्त
  • खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची नाशिक दौऱ्यात माहिती
  • जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांचा घेतला आढावा
  • ३० जूनपूर्वी २८८ मतदार संघात बीएलए नियुक्ती पूर्ण करणार
नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात मतदार यादी पुनरीक्षणाच्या मोहीमेची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने राज्यभरात बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नियुक्तीवर भर दिला आहे. राज्यातील सर्वच्या सर्व २८८ मतदार संघात पक्षाकडून बीएलए नियुक्त केले जाणार असून आतापर्यंत १.२५ एजंट्सची नेमणूक झाल्याची माहिती शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. खासदार डॉ. शिंदे यांनी सोमवारी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि देवळाली या विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी माहिती दिली. या आढावा बैठकीला मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मनीषा कायंदे, आमदार सुहास कांदे, सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे, माजी खासदार उन्मेष पाटील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Women Healthcare: महिलांच्या आरोग्य सेवेत नवा टप्पा; सांताक्रुझमध्ये ‘अँबर विंग’ची सुरुवात, यामी गौतम धर यांच्या हस्ते शुभारंभ

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने राज्यभरात विधानसभानिहाय मतदार संघाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यापासून झाली. नाशिकमधील इगतपुरी आणि देवळाली मतदार संघाचा आढावा घेतला. या दोन्ही मतदार संघात गटनिहाय सुमारे अडीच तास चर्चा झाली. पक्षाची ताकद आणि संघटना, मतदार यादी पुनरीक्षणासाठी बूथ लेव्हल एजंट नियुक्त्या झाल्यात की नाहीत, याचा आढावा सर्व मंत्र्यांनी घेतला.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, राज्यातील १०० विधानसभा, २२ जिल्ह्यांमध्ये जेथे परिषदेच्या निवडणुका आहेत तिथं आपण स्वत: आणि पक्षाचे मंत्री दौरे करतील आणि उर्वरित १५६ मतदार संघ आणि जिल्ह्यांची जबाबदारी मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ३० जूनपासून घरभेटीचा कार्यक्रम सुरु होणार असून त्यापूर्वी सर्वच २८८ मतदार संघात ‘बीएलए’ नियुक्त होतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेनेकडून आतापर्यंत राज्यात १.२५ लाख ‘बीएलएल’चे नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी विधानसभा निवडणूक, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षाकडून आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे पक्षाला मोठं यश मिळाले, असे ते म्हणाले.

नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचा १०० पेक्षा कमी मतांनी निसटता पराभव झाला. मात्र जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत आहे. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानंतर राज्यभरात शिवसेना संपर्कप्रमुख फिल्डवर काम करत आहेत. लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकात शिवसेनेला चांगलं यश मिळालं. आता उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकात देखील शिवसेना ताकदीनं उतरेल, असे ते म्हणाले.

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

Web Title: Shiv sena bla appointment drive maharashtra voter list revision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Election News
  • Shiv Sena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Ashadhi Wari 2026 : वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हसवडमध्ये प्रतिपादन
1

Ashadhi Wari 2026 : वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हसवडमध्ये प्रतिपादन

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा लवकरच वाजणार बिगूल; अंतिम मतदार यादी 4 ऑगस्टला होणार प्रसिद्ध
2

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा लवकरच वाजणार बिगूल; अंतिम मतदार यादी 4 ऑगस्टला होणार प्रसिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.