अजित पवार, एकनाथ शिंदे, भाजपकडे पक्ष प्रवेशाची मोठी यादी; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची खातेवाट शनिवारी करण्यात आली. 15 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता त्यानंतर तब्बल ७ दिवसांनंतर खातेवाटप करण्यात आली आहे. मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे काहीमंत्री नाराज आहेत. दरम्यान कॅबिनेट मंत्र्यांसाठी ही खातीचं आता डोकेदुखी ठरणार आहेत. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्र्यांसाठी निकष लावल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली.
Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड; 8 जणांना घेतलं ताब्यात
मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामाचा आता दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितलं. त्यामुळे प्रत्येक मंत्र्याने कोणत्याही परिस्थितीत काम करणं गरजेचं आहे. काम न करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यातून पैसे काढले जातील. चांगली कामगिरी न करणाऱ्यांना मंत्रिपद गमवावं लागू शकतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
संजय शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर नवी जबाबदारी दिली आहे. माझ्याकडे ज्या सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे, त्या खात्याची कामं तातडीने काम सुरू करणार आहे. संभाजीनगरचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील.जमिनीवर सुरू असलेले अतिक्रमण थांबवण्यावर माझा भर असेल. जमीन बळकावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सिल्लोड असो वा छत्रपती संभाजीनगर, जमीन बळकावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
Maharashtra Politics : मोठी बातमी! राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र, आदित्य आणि अमितही पोहोचले
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, पालकमंत्री असो, आमदार असो वा खासदार असो, शासकीय निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसंच निधीचे असमान वाटप झाल्यास कारवाई केली जाईल, यासाठी आम्ही डीपीडीसीकडून अहवाल मागवला आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरसाट म्हणाले की, ते मोठे नेते आहेत. ते त्याचा वाढदिवस शहरात किंवा मुंबईत साजरा करू शकतात. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, ते पुन्हा येणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.त्यावर उत्तर देताना शिरसाट यांनीही पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील, असं उत्तर दिलं आहे.
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
1. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
2. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
3. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
4. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
5. योगेश कदम – गृहराज्य शहर
6. पंकज भोयर – गृहनिर्माण,