राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र, आदित्य आणि अमितही पोहचले
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत. त्यातच येत्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची उत्सुकता असतानाच आज दोघंही एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेही उपस्थित होते.
Akhilesh Shukla : मोठी बातमी! मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाला अखेर अटक
राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं दादरमध्ये थाटामाटात लग्न पार पडलं. या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब हजेरी लावली. याच लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची चर्चा झाली. ठाकरे बंधू एकत्र यावेत ही अनेक मराठी माणसाची इच्छा आहे, पण राजकीय नसली तरी तर कौटुंबिक कारणामुळे ठाकरे एकत्र आले होते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? महाराष्ट्रात या चर्चा कायमच सुरू असतात. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवा पक्ष स्थापन केल्यापासून या चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे महाविकास आघाडीबरोबर होते.२०२२ नंतर मात्र राज ठाकरे महायुतीसोबत गेले.
दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एका लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेले दिसले. या दोघांमध्ये चर्चाही झाली. ती काय होती त्याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मात्र आता हे दोन नेते एकत्र आल्याने महापालिका निवडणुकीच्या आधी काही सूत्रं बदलतील का अशा चर्चा मुंबईतील राजकीय वर्तुळात रंगल्या अशून दोन बंधू आणि राजकीय नेते एकत्र येतील अशा चर्चां सुरु झाल्या आहेत.
बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून वेगळं होतं महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केला. उद्धव ठाकरे सुरुवातीला राजकारणात सक्रिय नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी कुणालाही राजकीय वारस असं जाहीर केलं नाही. मात्र तरीही त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला आणि मराठीचा मुद्दा उचलून धरला होता.
तर उद्धव ठाकरे यांनी २०१९ पर्यंत संयमी राजकारण केलं. बाळासाहेब ठाकरेंसारखा आक्रमक बाणा, स्पष्टवक्तेपणा त्यांच्याकडे नव्हता. पण त्यांच्या काळात पक्ष आणखी मोठा झाला. २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपदावरुन भाजपशी वाटाघाटी फिस्कटल्या आणि युती तुटली. ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह हातमिळवणी करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. उद्धव ठाकरे अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मात्र शिवसेनेत बंड झालं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह इतर अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे २० आमदार निवडून आले आहेत.