Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हाडाच्या घरांचा आणि राखीव जागांचा कोट्यवधींचा घोटाळा; अनिल परब यांचा गंभीर आरोप

नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रात भूखंडांची बेकायदेशीर पोटविभागणी करून म्हाडाच्या राखीव जागांचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 30, 2026 | 01:34 PM
म्हाडाच्या घरांचा आणि राखीव जागांचा कोट्यवधींचा घोटाळा; अनिल परब यांचा गंभीर आरोप

म्हाडाच्या घरांचा आणि राखीव जागांचा कोट्यवधींचा घोटाळा; अनिल परब यांचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:

मुंबई : नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रात भूखंडांची बेकायदेशीर पोटविभागणी करून म्हाडाच्या राखीव जागांचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. विधान परिषदेत बोलताना अनिल परब यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. नाशिक महापालिका हद्दीत नियमांच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी विकासक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने जमिनीचे बेकायदेशीर तुकडे पाडण्यात आल्याचे अनिल परब यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या मुद्द्यांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी ४९ जणांवर गुन्हे दाखल झाले असून, १८ ऑगस्टपर्यंत चौकशी अहवाल समोर येणार असल्याची ग्वाही दिली आहे.

 

अनिल परब म्हणाले, नाशिकसह महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात १९८१ च्या परिपत्रकाचे उल्लंघन करून जमिनीची पोटविभागणी केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. ना हरकत प्रमाणपत्र न घेताच ४ हजार चौ. मी. पेक्षा लहान प्लॉट पाडले गेले. ७/१२ वेगळे करून ले-आऊट मंजूर करताना म्हाडाचे २० टक्के राखीव, १० टक्के ओपन स्पेस आणि ५ टक्के सुविधा क्षेत्रही नाहीसे करण्यात आले. २०१३ पासून १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये विकासक, अधिकारी आणि नगररचना विभागाच्या संगनमताने हा घोटाळा सुरू आहे. शासनाने एमआरटीपी कायद्यानुसार सखोल चौकशी करून बेकायदेशीर ले-आऊट रद्द करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी परब यांनी केली आहे.

दोषी बिल्डरांकडून जमीन कशी परत घेणार?

अनिल परब म्हणाले, नाशिक महापालिकेत नियमांतून पळवाट काढत जमिनीचे तुकडे पाडण्यात आले. अशी २००० प्रकरणे झाली आहेत. ४९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाकी लोकांवर काय कारवाई केली? पिंकेश शहा या बिल्डरने १६४ फ्लॅट म्हाडाला दिले नाहीत. याचा हिशोब किती होतो, हे पाहा. या बिल्डरांनी ढापलेली जमीन परत कशी घेणार आहात? असे प्रकार केवळ नाशिकमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहेत. दोषींवर आपण काय कारवाई करणार आहात, अशी विचारणा देखील परब यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी चक्क अस्थींचेच सेवन; जादूटोण्याच्या नादात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

१८ ऑगस्टपर्यंत चौकशी अहवाल येणार

अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, या प्रकरणात आतापर्यंत ४९ लोकांवर कारवाई झाली आहे आणि त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. यामध्ये उपअधीक्षक, नायब तहसीलदार यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: Shiv sena leader anil parab has made a serious allegation regarding a scam involving mhadas reserved plots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Anil Parab
  • MHADA Homes
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?
1

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा
2

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन
3

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.