Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘उद्योगांबाबत फक्त दावे नको, आकडे जाहीर करा’; रोहित पवारांचा सरकारला सवाल

महाराष्ट्रातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. उद्योगमंत्री उदय सामंत यांना संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचे आव्हान देत त्यांनी गुंतवणूक, FDI आणि रोजगाराच्या आकडेवारीवर सरकारला सवाल केले.

  • By विवेक
Updated On: Aug 14, 2026 | 04:48 PM
Rohit Pawar

Rohit Pawar

Follow Us
Follow Us:
  • 2014 नंतर किती कंपन्या आल्या? रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
  • उद्योगमंत्री उदय सामंत यांना समोरासमोर प्रेस कॉन्फरन्सचे आव्हान
  • FDI, डावोस करार आणि रोजगाराच्या आकडेवारीवरून सरकारला घेरले
 

महाराष्ट्रातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात उद्योगांची संख्या वाढत असल्याचा सरकारकडून दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात किती कंपन्या महाराष्ट्रात आल्या आणि त्यातून किती रोजगार निर्माण झाले, याची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

मुख्यमंत्री 3 जून 2026 च्या आकडेवारीचा हवाला देत महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक उद्योग असल्याचे सांगत आहेत. गेल्या वर्षभरात 41 हजार 500 कंपन्या राज्यात आल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, 2014 नंतर प्रत्यक्षात महाराष्ट्रात किती कंपन्या आल्या? असा थेट सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

‘समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या’

चाकणमधील उद्योगांवरूनही रोहित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना आव्हान दिले. चाकणमधून कोणताही उद्योग बाहेर जाणार नसल्याचा सरकारचा दावा असेल, तर विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत असल्याची टीका करण्याऐवजी समोरासमोर संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी, असे ते म्हणाले. महाराष्ट्राची सध्याची आर्थिक परिस्थिती पुराव्यांसह आणि प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

‘डेटा सेंटरपेक्षा रोजगार देणारे उद्योग हवेत’

डेटा सेंटरमधील गुंतवणुकीवरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. मोठ्या गुंतवणुकीच्या तुलनेत डेटा सेंटरमधून मर्यादित रोजगार निर्माण होतात, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देणारे उत्पादन क्षेत्रातील उद्योग अधिक आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

FDI वाढीवरून सरकारला घेरले

2022 ते 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील FDI मध्ये 18 टक्के वाढ झाल्याचा दावा करत रोहित पवार यांनी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची कामगिरी कमी असल्याचे म्हटले. हरियाणा, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमधील FDI वाढीची आकडेवारीही त्यांनी सरकारसमोर ठेवली.

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

डावोस येथे झालेल्या करारांचा संदर्भ देत किती कंपन्यांनी प्रत्यक्ष महाराष्ट्रात उद्योग सुरू केले आणि किती रोजगार निर्माण केले, याची माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, महाराष्ट्रातील उद्योगांना तुलनेने जास्त औद्योगिक वीजदराचा फटका बसत असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला. त्यामुळे वाढती गुंतवणूक, उद्योगांचे स्थलांतर आणि रोजगारनिर्मिती या मुद्द्यांवर सरकारने स्पष्ट आकडेवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Rohit pawar maharashtra industries investment employment government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • rohit pawar
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?
1

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
2

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

Nitin Gadkari : ‘जातीच्या नावाखाली तिकीट घेणारा…’ जातीच्या राजकारणावर गडकरींचा निशाणा
3

Nitin Gadkari : ‘जातीच्या नावाखाली तिकीट घेणारा…’ जातीच्या राजकारणावर गडकरींचा निशाणा

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
4

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.