Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकनाथ शिंंदेंच्या हाताखाली काम करायला देवेंद्र फडणवीसांचा होता नकार; संजय राऊत यांचा दावा

एकनाथ शिंदे ज्युनियर आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती असा दावा आता खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 19, 2024 | 11:41 AM
एकनाथ शिंंदेंच्या हाताखाली काम करायला देवेंद्र फडणवीसांचा होता नकार; संजय राऊत यांचा दावा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील दाव्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. शरद पवार यांनी महा विकास आघाडीच्या युतीचा प्रयोग हा 2019 मध्ये नाही तर 2014 मध्येच होणार होता असा गौप्यस्फोट केला. यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्याबाबत राजकीय गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे ज्युनियर आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती असा दावा आता खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

2019 साली शिवसेना व भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन वाद निर्माण झाला. बहुमत असून देखील त्यांचे सरकार निर्माण झाले नाही. त्यानंतर शरद पवार व संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग साधला. त्यामुळे जास्त आमदार असून देखील भाजप विरोधी बाकावर जाऊन बसली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे अभुतपूर्व असे बंड झाले आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे अनेकदा टीका देखील केली जाते. मात्र यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नवा दावा केला आहे. शिवसेना व भाजप युतीमध्ये असताना देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार नव्हते असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

शिंदे कोणालाच नको होते

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले,  भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला निरोप पाठवला होतो, दिल्लीचा निर्णय काय येईल, हे आम्हाला माहीत नाही. परंतु आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाही. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनंगटीवार यांच्यासह भाजच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला. शिंदे कोणालाच नको होते. शिंदे यांच्या कामाची पद्धत कोणाला नको होती. आम्हीतर एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचे नेते केले होते. त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले असते. परंतु भाजपने विरोध केल्यामुळे तो निर्णय झाला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासारखे लोक कुवत नसताना या ठिकाणी पोहचले

पुढे ते म्हणाले, “भाजपशी चर्चा अयशस्वी झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा सुरु झाली. त्यावेळी या दोन्ही पक्षांनाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नको, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, असे सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, अजित पवार यांनी म्हटले होते, असा दावा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतान केला. एकनाथ शिंदे यांच्यासारखे लोक कुवत नसताना या ठिकाणी पोहचले आहेत.” अशा खोचक शब्दांत संजय राऊत यांनी सुनावले आहे.

Web Title: Shiv sena mp sanjay raut claims that dcm devendra fadnavis dont want to work with eknath shinde as he is junior nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2024 | 11:41 AM

Topics:  

  • DCM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • political news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
2

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
3

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
4

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.