कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महत्वपूर्ण योगदान असलेल्या शिवकालीन इतिहासांची साक्ष असलेल्या महाराष्ट्रातील दुर्ग गड-किल्ल्यांचे वेड केरळचा अवलिया एम. के. हमराज याला लागले आहे. मागील १६ महिन्यांत सायकलवर १४ हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून ३०२ हून अधिक किल्ल्यांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. कल्याणचा ऐतिहासिक वारसा आणि श्रद्धा स्थान असलेल्या कल्याण खाडी किनारी असलेल्या किल्ले दुर्गाडीला हमराजने बुधवारी भेट देत तेथील निसर्ग रम्य वातावरण आणि आई दुर्गाडी मातेचे दर्शन घेतले आहे. हमराजने आतापर्यंत ३०२ दुर्ग, गड किल्याची भ्रमंती केली असून त्यांचा इतिहास जाणून घेत आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाने भारावून त्यांनी शिवराज गायकवाड असे नामकरणही केले आहे.
काही ठिकाणच्या किल्ल्यांची झालेली दशा पाहून शिवराज गायकवाड यांनी खंत व्यक्त केली. शिवराज गायकवाड उर्फ एस. के. हमराज केरळचे आहेत. बी-काँम् पर्यंत शिक्षण झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेचा राजा म्हणून आपला नवलैविक अठरा पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करीत सर्व सामान्य जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत स्वराज्याचा डोलरा उभारला त्यांची साक्ष हे गड, किल्ले, दुर्ग देत आहेत.
१ मे २०२२ पासून केरळवरून एस. के हमराज ऊर्फ शिवराज गायकवाड यांनी सायकलवरून प्रवास सुरू केला. महाराष्ट्रातील ३४३ किल्ले करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवास करताना महाराजांच्या नावाने मला कधीच थकवा जाणवला नाही असे तो सांगतो. राज्यातील गड किल्ल्यांना भेट देणाऱ्या केरळच्या एम.के. हमराज यांनी रायगड, तोरणा, प्रतापगड, लोहगड, विजापूर, सुधागड, सासरगड हरिहर, माहुली, आशेरी, तांदूळवाडी काहोज, रोहिदा, रायरेश्वर, केंजळगड, वाडी किल्ला, लाडकूबाईच्या किल्ला.
पारोळा येथील भुईकोट किल्ला, पश्चिम महाराष्ट्र सह, संभाजी नगर, अहमदनगर, पुणे, नाशिक, ठाणे आदि जिल्ह्यातील गड किल्ले सायकल भंम्रती करीत सर करीत आहेत. हे गड किल्ले सर करतांना ते याबाबत जनजागृती देखील करीत आहेत. दरम्यान बुधवारी ते कल्याणमध्ये आले असतांना कल्याण पश्चिमेतील फडके मैदानासमोर असलेल्या तृप्ती सायकल मार्टच्या दुर्गेश झिपरे यांनी त्यांच्या सायकलची दुरुस्ती अगदी मोफत करून देत आपल्याकडील विविध प्रकारच्या सायकली दाखविल्या. तसेच दुर्गाडी किल्ल्यावर घेऊन जात किल्ल्याबद्दल माहिती दिली. यानंतर हमराज हे पालघरसाठी रवाना झाले.