Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Politics: ठाकरे सेनेला रत्नागिरीत मोठा धक्का! जिल्हा संपर्क प्रमुख ‘भाजप’च्या वाटेवर

Ratnagiri Politics- मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील असलेले सहदेव बेटकर हे कुणबी समाजातील प्रभावी नेते मानले जातात. ओबीसी समाजामध्येही त्यांचा चांगला प्रभाव मानला जातो. त्यामुळे आता त्यांच्या भाजप प्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 15, 2026 | 01:51 PM
Ratnagiri Politics, BJP Maharashtra, Konkan News, Political Switch,

Ratnagiri Politics, BJP Maharashtra, Konkan News, Political Switch,

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांचा राजीनामा
  • सहदेव बेटकर भाजपमध्ये प्रवेश करणार
  • कोकणात ठाकरे गटाला धक्का
Ratnagiri Politics : कोकणातील राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेाल रत्नागिरीत मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातआहे. ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून ते येत्या बुधवारी ( 17 जून) भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील असलेले सहदेव बेटकर हे कुणबी समाजातील प्रभावी नेते मानले जातात. ओबीसी समाजामध्येही त्यांचा चांगला प्रभाव मानला जातो. त्यामुळे आता त्यांच्या भाजप प्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाजप प्रवेशामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

Tukaram Munde FDA Raid: महिलांनो सावध राहा! स्तनांचा आकार वाढवणारे प्रॉडक्ट्स अन्…; आता Beauty Products

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच बेटकर यांनी ठाकरे सेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू होत्या. आता या चर्चांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बुधवारी सहदेव बेटकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Nagpur Crime: धक्कादायक! काळी जादू, धर्मांतर अन् सक्तीचा निकाह; नागपुरात विवाहितेसोबत अत्याचार

कोकण हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. अशा परिस्थितीत ठाकरे गटातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने भाजपची वाट धरल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर होत असलेल्या या पक्षांतरामुळे कोकणातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सहदेव बेटकर यांच्या अधिकृत भाजप प्रवेशाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Shivsena leader sahadev betkar joining bjp on june 17

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 01:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.