Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला, संघटना मजबूत करणार, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने खासदार डॉ. शिंदे यांनी आज बीड जिल्ह्यातील केज येथे केज व परळी विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक घेतली.

  • By विवेक
Updated On: May 29, 2026 | 06:11 PM
Shivsena MP Shrikant Shinde on Marathwada tour, Shivsena MP Shrikant Shinde , Eknath Shinde, Shivsena, Marathwada, Beed,

Shivsena MP Shrikant Shinde on Marathwada tour, Shivsena MP Shrikant Shinde , Eknath Shinde, Shivsena, Marathwada, Beed,

Follow Us
Follow Us:

मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला राहण्यासाठी इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यांला पक्ष ताकद देईल, असे आश्वासन शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिले. शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने खासदार डॉ. शिंदे यांनी आज बीड जिल्ह्यातील केज येथे केज व परळी विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक घेतली. यावेळी मंत्री भरत गोगावले. खासदार संदिपान भुमरे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार संगीता ठोंबरे व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, “मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. बीड जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने प्राधान्य दिलंय. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जोमाने काम करा. पक्ष कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम करेल, असे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी दिले. परळी, केजमधील तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुखांच्या लवकरच नियुक्त्या केल्या जातील, असे ते म्हणाले. पक्ष नेतृत्वाचे सामान्य कार्यकर्त्यावर लक्ष आहे. जो काम करेल त्यालाच पद मिळेल,” असे ते म्हणाले.

या बैठकीत मंत्री भरत गोगावले यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण मोहीमेसाठी बूथ लेव्हल एजंटची जबाबदारी किती महत्वाची आहे, याची माहिती दिली. “निवडणूक आयोगाच्या ‘बीएलओ’सोबत ‘बीएलए’ समन्वय करणार आहेत, त्यामुळे प्रत्येक बूथवर आपले किती मतदार आहेत, याची खातरजमा बीएलए १, बीएलए २ यांनी करुन घ्यायची आहे,” असे ते म्हणाले. “शिवसेनेसाठी शिवसैनिक कवचकुंडलं आहेत,” असे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. आताही शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याच विचाराने संघटना पुढे नेत आहेत, असे मंत्री गोगावले म्हणाले. पक्षाला पुन्हा मराठवाड्यात मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी संघटनेसाठी झोकून काम करावे,” असे आवाहन मंत्री गोगावले यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेशबंदी, दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून घंटानाद आंदोलन

खासदार डॉ. शिंदे यांनी बीड जिल्ह्यात तीन बैठका घेतल्या. पहिल्या बैठकीत कैज आणि परळी विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. पाटोदा येथे झालेल्या दुसऱ्या बैठकीत बीड आणि माजलगाव आणि तिसऱ्या बैठकीत आष्टी आणि गेवराई विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला.

निवेदन देण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे निधन, खासदारांची पाच लाखांची मदत

दहा दिवसांपूर्वी मुलाचे निधन झाल्याने गफूर सय्यद हे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदन देण्यासाठी केज येथे आले होते. यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केले असता तिथं रसूल सय्यद यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. शिंदे यांनी रसूल सय्यद यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. या भेटी दरम्यान खासदार डॉ. शिंदे यांनी रसूल गफूर सय्यद यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत केली. रसूल गफूर सय्यद यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार संदीपान भुमरे, माजी आमदार संगीता ठोंबरे, युवा सेना निरीक्षक बाजीराव चव्हाण आदी उपस्थित होते.

श्रीकांत शिंदे यांनी ३ दिवसांत २३ विधानसभा मतदार संघाचा घेतला आढावा

‘शिवसंवाद’च्या निमित्ताने शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रणरणत्या उन्हात देखील मराठवाड्याचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात खासदार डॉ. शिंदे यांनी जालना, नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातील २३ विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला. शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने खासदार डॉ. शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. मराठवाड्यातील कडक उन्हाची पर्वा न करता शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते प्रत्येक बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी नाशिक, ठाणे या जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा खासदार डॉ. शिंदे यांनी आढावा घेतला होता.

“महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल,” ‘मुंबई टेक विक 2026’ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान

Web Title: Shivsena mp shrikant shinde on marathwada tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Marathwada
  • shivsena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
1

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
3

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.