छत्रपती संभाजीनगर: ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले आहे. संभाजीनगरमधील पाणीप्रश्न, छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरण, जालिंदर सुपेकर, लाडकी बहीण आणि संजय राऊत यावर भाष्य केले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “सरकारने दुर्लक्ष केल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबरची तारीख दिली आहे. जर त्यांनी दिलेल्या तारखेनुसार, जलवाहिनीतून पाणी आले तर मी एक नोव्हेंबरला स्वतःमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करणार. मात्र पाणी दिले नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करणार.”
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी दरोडा पडला होता. या दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी अमोल खोतकर याला पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चकमकीत ठार केले. याबाबत बोलताना दानवे म्हणाले, “पालकमंत्री संजय शिरसाट काही तपास अधिकारी नाही. आपण पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे. दरोड्यातील पाच आरोपी पकडले. एकाचा एन्काऊंटर केला. मग सोने कुठे आहे? दरोड्यातील सोन्याच्या वाट्यावरून एन्काऊंटर झालं, असे लोक म्हणतात, आणि सोने कुठे आहे असा प्रश्न जनतेच्या मनात आहे.” ज केलेली आहे, ती चुकीची आहे. उद्योगपती किती बुडवितात ते पाहा. जे कर्ज बुडवितात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
उद्योजकाच्या घरावर दरोडा टाकणारा ठार
गुन्हे शाखेचे पथक सोमवारी मध्यरात्री वडगाव कोल्हाटी येथे पोहोचले. पोलिसांना पाहताच अमोल खोतकर गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने पोलीस पथकावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर अमोल खोतकरने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि या चकमकीत अमोल खोतकर ठार झाला. या चकमकीनंतर पोलिसांकडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. एन्काऊंटर नेमका कसा झाला? याची कोणतीही माहिती आणि तपशील द्यायला पोलिसांनी नकार दिलेला आहे. आता पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देणार का? याकडे सर्वांचा लक्ष लागलेला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस एन्काऊंटर, उद्योजकाच्या घरावर दरोडा टाकणारा ठार
१५ मे रोजी पहाटे संतोष लड्डा यांच्या बजाज नगरमधील बंगल्यावर दरोडा पडला होता. लड्डा कुटुंबीय त्या वेळी परदेशात होते. केअरटेकरच्या डोक्यावर बंदूक ठेवून चोरट्यांनी तब्बल ८ किलो सोने, ४० किलो चांदी आणि रोख रक्कम लुटली होती. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपी अटकेत असून अमोल खोतकर हा सहावा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. चोरीचा मुद्देमाल अमोल खोतकरकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले होते. मात्र अमोल खोतकर हा पळून जाण्याच्या मार्गावर होता. त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी चढवली त्यानंतर त्याने गोळीबार करण्यास सुरवात केली. त्या पोलिसांनी दिलेल्या प्रतिउत्तरात अमोल खोतकर हा ठार झाला.