छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी दरोडा पडला होता. या दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी अमोल खोतकर याला पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चकमकीत ठार केले. वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी भागात पोलिसांच्या गुन्हे शाखेला अमोल खोतकरच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.
बीड जिल्ह्यात भीषण अपघात, अपघातात वाचले, पण मृत्यू टळला नाही, सहा जणांचा जागीच मृत्यू,
नेमकं काय घडलं?
गुन्हे शाखेचे पथक सोमवारी मध्यरात्री वडगाव कोल्हाटी येथे पोहोचले. पोलिसांना पाहताच अमोल खोतकर गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने पोलीस पथकावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर अमोल खोतकरने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि या चकमकीत अमोल खोतकर ठार झाला. या चकमकीनंतर पोलिसांकडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. एन्काऊंटर नेमका कसा झाला? याची कोणतीही माहिती आणि तपशील द्यायला पोलिसांनी नकार दिलेला आहे. आता पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देणार का? याकडे सर्वांचा लक्ष लागलेला आहे.
१५ मे रोजी पहाटे संतोष लड्डा यांच्या बजाज नगरमधील बंगल्यावर दरोडा पडला होता. लड्डा कुटुंबीय त्या वेळी परदेशात होते. केअरटेकरच्या डोक्यावर बंदूक ठेवून चोरट्यांनी तब्बल ८ किलो सोने, ४० किलो चांदी आणि रोख रक्कम लुटली होती. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपी अटकेत असून अमोल खोतकर हा सहावा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. चोरीचा मुद्देमाल अमोल खोतकरकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले होते. मात्र अमोल खोतकर हा पळून जाण्याच्या मार्गावर होता. त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी चढवली त्यानंतर त्याने गोळीबार करण्यास सुरवात केली. त्या पोलिसांनी दिलेल्या प्रतिउत्तरात अमोल खोतकर हा ठार झाला.
पोलिस सहभागाचा संशय
अलीकडेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या दरोड्याच्या प्रकरणात पोलीस सहभागाचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळेच अमोल खोतकरच्या चकमकीत झालेल्या मृत्यूमुळे नवीन चर्चांना उधाण आले आहे.
बार्शीत मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाखाली अडकली एसटी बस, 27 प्रवाशांची सुखरूप सुटका