Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivshahi Housing Project: काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती

Shivshahi Housing Project: राज्यातील सर्वसामान्यांसाठी घराचं स्वप्न पूर्ण होणार असून कल्याण-अंबरनाथमध्ये अवघ्या १९ लाखांत घर मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजना २.० अंतर्गत कल्याण आणि अंबरनाथ येथे प्रत्येकी ५ हजार अशी एकूण १० हजार घरे उभारण्याचे नियोजन आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 17, 2026 | 01:06 PM
काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती

काय सांगता! अवघ्या १९ लाखांत मिळणार घर; कुठे आणि कसं? जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us
Follow Us:
  • सर्वसामान्यांसाठी घराचं स्वप्न होणार पूर्ण
  • कल्याण-अंबरनाथमध्ये अवघ्या १९ लाखांत मिळणार घर!
  • शिवशाही उभारणार १० हजार परवडणारी घरे
Shivshahi Housing Project: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडने मोठी तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान आवास योजना २.० (PMAY 2.0) अंतर्गत राज्यात १० हजार परवडणारी घरे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात कल्याण आणि अंबरनाथ या दोन शहरांची निवड करण्यात आली असून प्रत्येकी पाच हजार घरे बांधली जाणार आहेत. विशेष म्हणजे, या घरांची संभाव्य किंमत सुमारे १९ लाख रुपये असणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी ही मोठी संधी ठरू शकते.(Shivshahi Housing Project)

कल्याण आणि अंबरनाथमध्ये १० हजार घरांचे नियोजन

शिवशाहीच्या प्रस्तावानुसार, कल्याणमध्ये ६० एकर सरकारी जागेवर पाच हजार घरांची उभारणी केली जाणार आहे. तर अंबरनाथमध्ये ३० एकर जागेवर आणखी पाच हजार घरे बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण ९० एकर सरकारी जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, ही जमीन केवळ एक रुपया प्रति एकर या नाममात्र दराने प्रकल्पासाठी देण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावाला राज्यस्तरीय नियंत्रण समितीने मंजुरी दिली आहे. आता राज्य सरकारकडून या प्रस्तावाची केंद्र सरकारकडे शिफारस केली जाणार आहे. केंद्राची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू होईल.

Mumbai local Train: विनातिकीट प्रवाशाच्या रागाचा फटका भलत्याच निरपराध नागरिकाला; मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

३३२ चौरस फुटांचे घर, किंमत सुमारे १९ लाख रुपये

या योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या इमारती २३ मजली असणार आहेत. प्रत्येक घराचे चटई क्षेत्रफळ ३३२ चौरस फूट ठेवण्यात येणार आहे. या घरांची किंमत अंदाजे १९ लाख रुपयांच्या आसपास असेल, अशी माहिती शिवशाहीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. केवळ घरे उभारण्यापुरतेच या प्रकल्पाचे नियोजन मर्यादित नसून नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. इमारतींमध्ये लिफ्ट, पाणीपुरवठा, वीज, रस्ते आणि इतर आधुनिक सुविधा देण्यावर भर असेल. बांधकामाचा दर्जा राखण्यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

१९ नोव्हेंबरला केंद्र सरकारची बैठक

शिवशाहीच्या या प्रस्तावासंदर्भात १९ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर विचार होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा होईल. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच डिसेंबर महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्याची शिवशाहीची तयारी आहे.

कल्याण-डोंबिवलीत समूह पुनर्विकास प्रकल्पाचीही तयारी

दरम्यान, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडकडून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात समूह पुनर्विकास प्रकल्प राबविण्याचाही प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यानंतर आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे.

एकूणच, कल्याण आणि अंबरनाथमधील १० हजार घरांचा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास या परिसरातील परवडणाऱ्या घरांच्या उपलब्धतेत वाढ होऊ शकते. मात्र, घरांसाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि लाभार्थी निवडीचे निकष याबाबतची अधिकृत माहिती केंद्र व राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Health Update: पालिका रुग्णांना ग्लोबलमध्ये बेड! केईएम रुग्णालयामार्फत पात्र रुग्णांची निवड आणि संदर्भ प्रक्रिया

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिवशाही प्रकल्पांतर्गत किती घरे उभारली जाणार आहेत?

    Ans: पंतप्रधान आवास योजना २.० अंतर्गत शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडकडून पहिल्या टप्प्यात एकूण १० हजार घरे उभारण्याचे नियोजन आहे.

  • Que: ही घरे कुठे आणि किती जागेवर उभारली जाणार आहेत?

    Ans: कल्याणमध्ये ६० एकर जागेवर ५ हजार घरे, तर अंबरनाथमध्ये ३० एकर जागेवर ५ हजार घरे उभारली जाणार आहेत.

  • Que: या घरांची किंमत आणि आकार किती असणार आहे?

    Ans: प्रस्तावित घरांचे चटई क्षेत्रफळ ३३२ चौरस फूट असून एका घराची संभाव्य किंमत सुमारे १९ लाख रुपये असणार आहे.

Web Title: Shivshahi pmay 2 homes kalyan ambernath 10000 affordable houses sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • kalyan
  • maharashtra
  • PM Awas Yojana news
  • Pradhan Mantri Awas Yojana

संबंधित बातम्या

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात
1

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात

रात्रीच्या अंधारात मुलींना अर्ध्या रस्त्यात उतरवणं पडलं महागात! एसटी चालक-वाहकांचे निलंबन, परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा!
2

रात्रीच्या अंधारात मुलींना अर्ध्या रस्त्यात उतरवणं पडलं महागात! एसटी चालक-वाहकांचे निलंबन, परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा!

Bhandara News: भंडारा-मुंढरी बसमधील प्रकार; दोन विद्यार्थिनींना अंधारातच उतरविले! विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Bhandara News: भंडारा-मुंढरी बसमधील प्रकार; दोन विद्यार्थिनींना अंधारातच उतरविले! विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वीजबिल वसुलीचे महावितरणसमोर मोठे आव्हान; पुणे विभागात तब्बल 438.8 कोटी रुपये थकीत
4

वीजबिल वसुलीचे महावितरणसमोर मोठे आव्हान; पुणे विभागात तब्बल 438.8 कोटी रुपये थकीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.