Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: शेवगावमधील वृक्षतोड प्रकरण पेटणार? वन अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात कथित अवैध वृक्षतोड आणि लाकूड घोटाळ्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात दोषी वन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 30, 2026 | 12:00 PM
शेवगावमधील वृक्षतोड प्रकरण पेटणार? वन अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

शेवगावमधील वृक्षतोड प्रकरण पेटणार? वन अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • शेवगावमधील अवैध वृक्षतोड आणि लाकूड घोटाळा
  • दोषी वन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • लाकूड घोटाळ्याप्रकरणी वन विभागावर गंभीर आरोप
पोपट पिटेकर,अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात हजारो झाडांची बेकायदेशीर आणि भीषण कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोषी वन अधिकाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करावे, या प्रमुख मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आणि जिल्हा वनसंरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल यांना सादर करण्यात आले. (Ahilyanagar News)

दुष्काळाच्या काळात निसर्गावर दरोडा; प्रशासकीय दुर्लक्ष संशयास्पद- सध्या संपूर्ण राज्यासह अहिल्यानगर जिल्हा भीषण दुष्काळ, वाढते तापमान आणि पाण्याच्या तीव्र तुटवड्याचा सामना करत आहे. अशा अत्यंत नाजूक परिस्थितीत निसर्गाचे रक्षण करणाऱ्या हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल होणे आणि जबाबदार प्रशासकीय यंत्रणांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे ही अतिशय संशयास्पद व निषेधार्ह बाब आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

Navrashtra Impact: अहिल्यानगर वनविभागाचा निर्लज्ज कारभार: पोस्टरवर ‘झाड लावा’ चा संदेश, प्रत्यक्षात हजारो झाडांची कत्तल

संशयित अधिकारी,वखारींमध्ये संगनमत

शेवगाव परिसराचे दप्तर, प्रत्यक्ष पाहणी, देखरेख आणि संरक्षणाची प्राथमिक जबाबदारी असतानाही कर्तव्यात गंभीर कसूर करणाऱ्या खालील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मिलिंद गोवेकर, वनक्षेत्र अधिकारी, संदीपकुमार एकशिंगे,वनपाल,सचिन शिंदे,वनपाल, फिरते पथक, बालकृष्णा बडे,वनरक्षक, अर्जुन खेडकर,वनरक्षक, फिरते पथक,सागर साळवे,वनरक्षक, विजय पावले,वनरक्षक शेवगाव येथील अनेक लाकूड वखारींमध्ये हजारो झाडांची कत्तल करून, वनरक्षक व वनपाल यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर लाकडांचा अवैध साठा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

१० दिवस उलटूनही कारवाई नाही

ही घटना उघडकीस येऊन १० दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरीही दोषींवर वनविभागाकडून कोणतीही ठोस प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई झालेली नाही. स्थानिक वन कर्मचाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाकडांची कत्तल, वाहतूक आणि साठवणूक होणे अशक्य आहे. तसेच, शेवगावमधील या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अतिशय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर अभयारण्य परिसरातही अशाच प्रकारे वृक्षतोड होत असल्याच्या बातम्या समोर येत असून, यावर प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा

पर्यावरणाचा विनाश करून नागरिकांच्या जीविताला धोक्यात आणल्याप्रकरणी संबंधित सर्व दोषी वन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करावे आणि यामागील लाकूड माफिया, सॉमिल मालक व मुख्य सूत्रधारांचा पर्दाफाश करावा, असे निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे. प्रशासनाने या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Murder Case: अहिल्यानगरमध्ये १० वर्षांच्या प्रेमसंबंधाचा थरारक अंत! ग्रामपंचायत कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याची हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेवगाव तालुक्यात कोणत्या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे?

    Ans: शेवगाव तालुक्यातील कथित अवैध वृक्षतोड आणि लाकूड घोटाळ्याच्या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे.

  • Que: वंचित बहुजन आघाडीने कोणत्या मागण्या केल्या आहेत?

    Ans: या प्रकरणातील दोषी वन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • Que: वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा काय इशारा दिला आहे?

    Ans: मागण्यांवर योग्य कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

Web Title: Shevgaon illegal tree cutting timber scam action against forest officials vanchit bahujan aghadi sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Forest Department
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

Navrashtra Impact: अहिल्यानगर वनविभागाचा निर्लज्ज कारभार: पोस्टरवर ‘झाड लावा’ चा संदेश, प्रत्यक्षात हजारो झाडांची कत्तल
1

Navrashtra Impact: अहिल्यानगर वनविभागाचा निर्लज्ज कारभार: पोस्टरवर ‘झाड लावा’ चा संदेश, प्रत्यक्षात हजारो झाडांची कत्तल

Murder Case: अहिल्यानगरमध्ये १० वर्षांच्या प्रेमसंबंधाचा थरारक अंत! ग्रामपंचायत कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याची हत्या
2

Murder Case: अहिल्यानगरमध्ये १० वर्षांच्या प्रेमसंबंधाचा थरारक अंत! ग्रामपंचायत कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याची हत्या

Maharashtra Drought: देवाक काळजी रे! ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई; तातडीने पाण्याचे…
3

Maharashtra Drought: देवाक काळजी रे! ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई; तातडीने पाण्याचे…

Bhimashankar मध्ये वृक्षतोड सुरू आहे की नाही? उडालेल्या संभ्रमानंतर वन विभागाकडून झाला ‘हा’ खुलासा
4

Bhimashankar मध्ये वृक्षतोड सुरू आहे की नाही? उडालेल्या संभ्रमानंतर वन विभागाकडून झाला ‘हा’ खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.