मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट
मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल (बुधवार, २७ मे) गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे ऊस व कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री व इतर मान्यवर उपस्थित होते. या बैठकीनंतर आज लगेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.
आमचे नेते आणि देशाचे लाडके मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन प्राप्त केले. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही त्यांना यावेळी दिली. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची… pic.twitter.com/4OZJTVrcm0 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 28, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या भेटीची माहिती दिली. ते यावेळी म्हणाले, “आमचे नेते आणि देशाचे लाडके मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन प्राप्त केले. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही त्यांना यावेळी दिली. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट आणि मार्गदर्शन हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारे असते. त्यांचे अतिशय मनःपूर्वक आभार!”
भाजप संघटनेत मोठे फेरबदल; पंजाब, हरियाणासह ‘या’ चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले
राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकरी, पेट्रोल डिझेलचा तुटवडा आणि दरवाढ तसेच मराठा आरक्षण यांसारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी अमित शाह यांच्या नेतृत्वात आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात येत आहे. साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवरील अधिभार आदी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, याबाबत केंद्र सरकार लवकरच अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
‘महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 17 जागा लढवणार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान






