Matoshree call to Devendra Fadnavis: 'मातोश्री'वरून थेट देवेंद्र फडणवीसांना फोन अन् झटका एकनाथ शिंदेंना
Matoshree call to Devendra Fadnavis: शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या चार वर्षांत भाजप आणि शिवसेना ठाकरे गटातून विस्तवही जात नाही. दोन्ही गट एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण शिवसेना सत्ताधारी भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन गेल्यानंतर मुंबई महापालिकेच्या सुधारणा समितीमार्फत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना स्थिगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून त्यावर विविध स्तरांवर चर्चा सुरु झाली आहे.
विशेष म्हणजे, सुधारणा समितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व असल्याने या निर्णयांकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे. स्थगिती देण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांवरील दोन भूखंडांचे हस्तांतरण, सेव्हनहिल्स हॉस्पिटल या खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव, तसेच काही उपनगरीय रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाचा समावेश आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या यांच्या हस्तक्षेपानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप करत मुंबईतील मोक्याच्या जागा खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला होता.
आदित्य ठाकरे यांनी सेव्हन हिल्स हॉस्पिटल, उपनगरीय रक्तपेढ्या, वांद्रे रिक्लमेशन आणि मलबार हिल ग्रीन झोनसंदर्भातील प्रस्तावांवर आक्षेप घेत हे निर्णय वादग्रस्त असल्याचा दावा केला होता. मुंबई महापालिकेची सुधारणा समिती शहरातील मोठे बांधकाम प्रकल्प, रस्ते सुधारणा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पाना मंजुरी देणारी अत्यंत महत्त्वाची समिती मानील जाते. सध्या या समितीचे अध्यक्षपद विपूल दोषी यांच्याकडे आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे विश्वासू मानले जाणारे मिलींद नार्वेक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मिलींद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून या प्रस्तावांची माहिती दिली होती. नार्वेकर यांच्या संपर्कानंतर भाजपच्या नगरसेवक आणि पक्षनेत्यांकडू सविस्तर अहाल मागवून संबंधित चारही प्रस्तावांना तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे एकनाथ शिंदेंच्या गटात नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा असून, ठाकरे गट आणि भाजपमध्ये पडद्यामागे काही राजकीय हालचाली सुरू आहेत का, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.






