Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटी कर्मचाऱ्यांची थकीत देणी रक्कम देण्यात एकनाथ शिंदे आघाडीवर, तर अजित पवार मात्र पिछाडीवर; श्रीरंग बरगे यांचा टोला

एसटी कर्मचाऱ्यांच्या ४४०० कोटी रुपयांच्या थकीत देण्यासंदर्भात विविध संघटनांनी गेल्या आठवड्यात आंदोलनाच्या नोटीस दिल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक बोलावली होती. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 19, 2025 | 01:43 PM
एसटी कर्मचाऱ्यांची थकीत देणी रक्कम देण्यात एकनाथ शिंदे आघाडीवर

एसटी कर्मचाऱ्यांची थकीत देणी रक्कम देण्यात एकनाथ शिंदे आघाडीवर

Follow Us
Close
Follow Us:
  • एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळात वेतनवाढ जाहीर
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या ४४०० कोटी रुपयांच्या थकीत
  • अंदाजे ११०० कोटी रुपयांचा महागाई भत्ता फरक थकीत
 

मुंबई : ८८ हजार एसटी कर्मचाऱ्यांना सन २० ते २४ या कालावधी करिता परिवहन खात्याचा भार असलेले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळात वेतनवाढ जाहीर केली होती. पण त्याचा फरक मात्र देण्यात आला नव्हता. आता फरकाची थकीत सर्व रक्कम देण्याचा निर्णय त्यांनीच घेतला असून सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच विषयावर स्वतः लावलेली बैठक रद्द करण्याची नामुष्की ओढवल्याने ते मात्र या स्पर्धेत मागे पडले असल्याचा मिस्किल टोला महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी लगावला आहे.

आपत्तीग्रस्तांना 3258 कोटींचा निधी मंजूर; मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची माहिती 

एसटी कर्मचाऱ्यांच्या ४४०० कोटी रुपयांच्या थकीत देण्यासंदर्भात विविध संघटनांनी गेल्या आठवड्यात आंदोलनाच्या नोटीस दिल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक बोलावली होती. पण ती बैठक अचानक रद्द करण्यात आली. याउलट याच सरकारमधील उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि बैठक घेतली व त्या बैठकीत बैठकीत ते स्वतः मुख्यमंत्री व परिवहन मंत्री असतानाच्या कालावधीची त्यांनी जाहीर केलेली वेतनवाढ फरकाची थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना ४८ हप्त्यात देण्याचा निर्णय घेत बाजी मारली असून या राजकीय स्पर्धेत ज्यांच्याकडे अर्थ खाते आहे त्या अजित पवार यांना मात्र स्वतःच लावलेली बैठक नामुष्कीने रद्द करावी लागल्याने.. या स्पर्धेत ते नक्की पिछाडीवर राहिले असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी व महायुती या सरकारमध्ये अजित पवार यांच्या कडे अर्थ खाते!

सन २०१८ पासूनचा एसटी कर्मचाऱ्यांचा अंदाजे ११०० कोटी रुपयांचा महागाई भत्ता फरक थकीत असून तो अद्यापि देण्यात आलेला नाही.या संपूर्ण कालावधीत महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही सरकारमध्ये विद्यमान उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच अर्थ खाते असून महागाई भत्त्याची राहिलेली फरकाची रक्कम देण्याची जबाबदारी आता अजित पवारांनी पूर्ण करावी अन्यथा या राजकीय स्पर्धेत अजित पवार हे पिछाडीवर व शिंदे आघाडीवर असेच म्हणावे लागेल असेही बरगे यांनी म्हटले आहे.

मोखाड्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न, निवडणूकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन

Web Title: Shrirang barge on eknath shinde is ahead in paying the dues of st employees while ajit pawar is behind

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • st bus
  • ST Employees

संबंधित बातम्या

KDMC Politics: मनसेचा शिंदेंना पाठिंबा, राज ठाकरे नाराज? संजय राऊतांनी कल्याण-डोंबिवलीतील ‘त्या’ निर्णयावर फोडला बॉम्ब
1

KDMC Politics: मनसेचा शिंदेंना पाठिंबा, राज ठाकरे नाराज? संजय राऊतांनी कल्याण-डोंबिवलीतील ‘त्या’ निर्णयावर फोडला बॉम्ब

BMC Election 2026:  सत्तावाटपाचे नवे समीकरण; मुंबईच्या बदल्यात नाशिक, एकनाथ शिंदे तडजोड करण्यास तयार
2

BMC Election 2026:  सत्तावाटपाचे नवे समीकरण; मुंबईच्या बदल्यात नाशिक, एकनाथ शिंदे तडजोड करण्यास तयार

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’वर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; सर्वांचे लागले निकालाकडे लक्ष
3

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’वर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; सर्वांचे लागले निकालाकडे लक्ष

“हिंमत असेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्या…” नाना पटोलेंचं भाजपला खुलं आव्हान; शिंदे-अजित पवारांबाबत केला मोठा दावा
4

“हिंमत असेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्या…” नाना पटोलेंचं भाजपला खुलं आव्हान; शिंदे-अजित पवारांबाबत केला मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.