आपत्तीग्रस्तांना ३,२५८ कोटींचा निधी मंजूर (संग्रहित फोटो)
मुंबई : सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या २३ जिल्ह्यातील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना ३,२५८ कोटी ५६ लाख ४० हजार रुपयांची मदत वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. २७ लाख ५९ हजार ७५४.७७ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त पिकांसाठी ही मदत तातडीने वितरित केली जाणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
आतापर्यंत ५००० कोटींचा निधी वितरित करण्याचे आदेश निर्गमित झाले असून, यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीसाठी आतापर्यंत ७५०० कोटींची मदत मंजूर झाली आहे. नागपूर विभागातील ३.७६ लाख शेतकऱ्यांसाठी ३४० कोटी, अमरावतीसाठी ४६३ कोटी, पुणे विभागातील ८.२५ लाख शेतकऱ्यांसाठी ९५१ कोटी, नाशिक विभागातील १५.७९ लाख शेतकऱ्यांसाठी १,४७४ कोटी आणि कोकणातील १.०५ लाख शेतकऱ्यांसाठी २८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर काम सुरू आहे. ही मदत शेतकऱ्यांचे जीवन सुसहाय करेल, असा विश्वास जाधव-पाटील यांनी व्यक्त केला. शासनाने तातडीने शासन निर्णय निर्गमित करून ही मदत वितरणाची प्रक्रिया गतिमान केली आहे.
27 लाख हेक्टर क्षेत्र बाधित
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे सातारा, कोलहापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. ३३ लाख ६५ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचे २७ लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी दिली.