Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sikandar Shaikh: प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखच्या ‘थार’चा भीषण अपघात; हायवेवरील डिव्हायडरला दिली धडक, वाहनाचे मोठे नुकसान

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख यांच्या ‘थार’ गाडीचा कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर गाडीने साईड डिव्हायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती असून, अपघातात वाहनाचा मोठा चक्काचूर झाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 10, 2026 | 05:10 PM
प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखच्या ‘थार’चा भीषण अपघात; हायवेवरील डिव्हायडरला दिली धडक, वाहनाचे मोठे नुकसान

प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखच्या ‘थार’चा भीषण अपघात; हायवेवरील डिव्हायडरला दिली धडक, वाहनाचे मोठे नुकसान

Follow Us
Follow Us:
  • प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखच्या ‘थार’चा भीषण अपघात
  • हायवेवरील डिव्हायडरला दिली धडक
  • वाहनाचे मोठे नुकसान
Sikandar Shaikh Thar Accident News Marathi : महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘महाराष्ट्र केसरी’ किताब विजेते पैलवान सिकंदर शेख यांच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरात रत्नागिरी-नागपूर महामार्गावर त्यांच्या ‘थार’ गाडीला अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या गाडीने रस्त्यावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, थार गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

या अपघातात सिकंदर शेख थोडक्यात बचावल्याची माहिती समोर येत असली, तरी अपघाताच्या वेळी ते स्वतः गाडीत होते का, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे या घटनेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. नेमका अपघात कसा झाला, वाहनाचा वेग किती होता आणि चालकाचे नियंत्रण कसे सुटले, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सिकंदर शेख हे महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील मोठे नाव मानले जाते. त्यामुळे त्यांच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.

Kolhapur – Sikandar Shaikh वर हिंदकेसरी पैलवान Dinanath Singh यांचे गंभीर आरोप

सिकंदर शेख हे प्रवासानिमित्त सांगोला-मिरज मार्गावरून जात असताना हा अपघात घडला. रस्ता आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कारचे समोरचे आणि बाजूचे भाग पूर्णपणे चक्काचूर झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, सिकंदर शेख हे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय नाव आहे. महाराष्ट्रातीलच नव्हेतर देशभरातील प्रसिद्ध मल्लांना आस्मान दाखवत सिकंदर शेखने कुस्तीच्या मैदानात आपला दबदबा निर्माण केला आहे. सिकंदरने महाराष्ट्र केसरीसह अनेक मानाच्या स्पर्धा जिंकत कुस्ती क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे.

Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं कारण काय?

Web Title: Sikandar sheikh thar accident kavathemahankal vithhalwadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Car Accident
  • maharashtra

संबंधित बातम्या

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास
1

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास

जिल्हा परिषदेच्या आदेशालाच हरताळ! ७ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश; ५० दिवस उलटूनही चौकशीही नाही
2

जिल्हा परिषदेच्या आदेशालाच हरताळ! ७ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश; ५० दिवस उलटूनही चौकशीही नाही

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक
3

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक

Amravati News: शेतात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ! शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; वनविभागाकडे पंचनाम्यासह भरपाईची मागणी
4

Amravati News: शेतात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ! शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; वनविभागाकडे पंचनाम्यासह भरपाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.