Vasai Fishing Boat Incident: गूढ वर्तुळामुळे मच्छिमारांमध्ये भीती! वसई समुद्रात अचानक नेमकं काय घडलं? (फोटो-सोशल मीडिया)
Vasai Fishing Boat Incident: वसई किनाऱ्यापासून ६६ नॉटिकल अंतरावर खोल समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचे दिसून आले होते. परंतु, ११ जानेवारी रोजी एका व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आलेल्या या घटनेनंतर सर्वच यंत्रणा सजग झाल्या होत्या. परंतु, घटनेस सात दिवसांचा अवधी गेला तरीही हा प्रवाह नक्की कशामुळे तयार झाला आहे. याचा मागमुस कुठल्याच यंत्रणेला लागलेला नाही. त्यामुळे मच्छिमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. समुद्राच्या त्या गूढ वर्तुळाचे अजूनही समोर आले नाही.
हे देखील वाचा: Social Media Rumors Alert: उरणमध्ये ‘मुले पळवणारी टोळी’ ची अफवा? पोलिस तपासात झाले उघड
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वसईतील पाचुबंदर येथील ‘ओम नमः शिवाय’ ही कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची मच्छीमार नौका समुद्रात मासेमारीसाठी निघाली होती. जीपीएस क्रमांक ३०-१५ ५५४, ७१-५८-५७६ या ठिकाणी मोठे गोलाकार वर्तुळ पाण्यामध्ये तयार झाले होते. त्यातून मादकट रंगाचे पाणी वेगाने निघत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्याआधीच सदर बोट या ठिकाणी अडकली होती. हे लक्षात येताच इंजिनाचा वेग वाढवून मच्छीमारांनी ही बोट बाहेर काढली. सुदैवाने ती बोट बाहेर पडली, त्यानंतर सदर घडलेली घटनेची मत्स्य अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर याबाबत तटरक्षक दल व नौदलाला कळवण्यात आले.
हे देखील वाचा: बारामतीतील कृषी प्रदर्शनात गर्दी; तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गूढ प्रवाहाचा भूकंपाशी संबंध आहे का?
पालघर जिल्हा हा भूकंप प्रवण क्षेत्र आहे, त्यामुळे शेकडो सौम्य धक्के या भागात कायम सुरू असतात. सदर प्रवाह भूकंपामुळे निर्माण झाला आहे का? असा प्रश्न मच्छिमारांमार्फत उपस्थित करण्यात येत आहे. कारण सप्टेंबर २०२३ मध्ये वसईपासून ३७ किमी दूर समुद्रात ३.८ तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला होता, ज्यामुळे जमीन हादरल्याचा अनुभव आला होता. या नव्या घटनेमुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण भूकंपाच्या धक्क्याने नवीन आपत्तीला देखील सामोरे जावे लागू शकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे-पालघर मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांनी घटनेची माहिती नौदल व तटरक्षक दलाला दिलेली असून त्यांच्याकडून अजूनही घटनेचा खुलासा झालेला नाही. सदर घटनेत भूकंप किवा तशा स्वरूपाची शक्यता नाही, तर ओएनजीसी च्या गॅसलाईनमुळे असे होऊ शकते. मात्र, तशी माहिती अजूनही प्राप्त नाही. असे सांगितले.






