Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग होणार पुन्हा हिरवागार, विद्यार्थ्यांचा अनोखा कुडाळ पॅटर्न

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. एकेका वृक्षाच्या बदल्यात पाच वृक्ष लावण्याचा नियम आहे. मात्र, गेल्या ११ वर्षात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत महामार्गावर एकही झाड लागलेले नाही. मात्र आता पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्ग हिरवागार होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 30, 2024 | 05:50 PM
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग होणार पुन्हा हिरवागार, विद्यार्थ्यांचा अनोखा कुडाळ पॅटर्न

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग होणार पुन्हा हिरवागार, विद्यार्थ्यांचा अनोखा कुडाळ पॅटर्न

Follow Us
Close
Follow Us:

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संचलित उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ यांच्यावतीने आज सकाळी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली. तसेच वृक्षसंवर्धन जनजागृती करण्यासाठी वृक्षदिंडी आणि पथनाट्य सादर करण्यात आले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्वीपासूनच सावली देणारा मार्ग म्हणून सर्वदूर विख्यात होता. तत्कालीन महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे वृक्ष होते. पण नवीन चौपदरीकरण कामात हजारो मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले नव्हे तर त्यांची कत्तलच करण्यात आली. या महावृक्षतोडीमुळे महामार्गावरील सावली नष्ट झाली आणि पर्यावरणाच्या साखळीलाही धोका निर्माण झाला. नियमानुसार, जितके वृक्ष तोडले तेवढे वृक्ष पुन्हा लावण्याची जबाबदारी शासन आणि संबंधित ठेकेदाराची असते. मात्र, ती त्यांनी अद्यापही पूर्ण न केल्याने मुळदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महामार्गावर वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जेव्हा सरकारने सुरू केले होते तेव्हा या संपूर्ण कामामध्ये महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या महाकाय वृक्षांचा पहिला बळी गेला होता. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावरची सावली नष्ट झाली होती. त्यामुळे महामार्गावर थांबून थोडा वेळ आराम करता येईल, अशी परिस्थिती सध्या राहिलेली नाही. वृक्षतोड आणि सिमेंटीकरण यामुळे महामार्गावर प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन वृक्षलागवडीची ही मोहीम राबविण्यात येणार आहे. कुडाळ ते पिंगुळीपर्यंत ५ किलोमीटर अंतरावर ही वृक्षलागवड रस्त्याच्या दुतर्फा करण्याचा संकल्प उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी करुन दाखविला.

या मोहिमेमध्ये महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व शहरातील प्रतिष्ठीत नागरीक विद्यार्थ्यांसोबत सहभागी होणार होते. यावृक्षलागवड कार्यक्रमा अंतर्गत कदंब, शीसम, कांचन, बेहडा, करंज, अर्जुन, बांबू ,उंबर, कोकम, पिंपरी पिंपरन ,चिंच,आवळा,अशोक ई. विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. भविष्यात या रोपांची जोपासना ही विद्यार्थी करणार आहेत. राष्ट्रीय महामार्गावर पर्यावरण संतुलन आणि पर्यावरण जागरूकता वृक्षलागवड आणि जोपासना या माध्यमातून करण्याचा अभिनव उपक्रम विद्यार्थी सुरू करून मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी एक चांगला संदेश देण्याचा केलेला प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला आहे.

Web Title: Sindhudurg in kundal mumbai to goa national highway will be green again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2024 | 05:50 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai-Goa highway

संबंधित बातम्या

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ
1

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ

Mumbai Amravati Flight: अमरावती-मुंबई विमानसेवा वेळेत पुन्हा बदल, जाणून घ्या वेळापत्रक
2

Mumbai Amravati Flight: अमरावती-मुंबई विमानसेवा वेळेत पुन्हा बदल, जाणून घ्या वेळापत्रक

Tata Hospital Bomb Threat : बॉम्ब धमक्यांची मालिका सुरूच, टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकीचा मेल; पोलिसांचा हायअलर्ट
3

Tata Hospital Bomb Threat : बॉम्ब धमक्यांची मालिका सुरूच, टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला धमकीचा मेल; पोलिसांचा हायअलर्ट

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा
4

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.