Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिसांना रायगड लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले

जिल्ह्यात लाचलुचपत विभागामार्फत फक्त तलाठी, ग्रामसेवक, लिपिक अशा कर्मचाऱ्यांवरच कारवाई होताना दिसते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 13, 2023 | 05:50 PM
सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिसांना रायगड लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे येथील लाचलुचपतच्या सावंतवाडी अधिकारी “ट्रॅप” मुळे सिंधुदुर्ग लाचलुचपत उपविभागाच्या कार्यक्षमतेवर “प्रश्नचिन्ह” निर्माण झाले आहे, गेल्या काही दिवसात ठाणे, रायगड येथील लाचलुचपत विभाग धाडी टाकतात मग, लाचलुचपत विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालय फक्त तलाठी, ग्रामसेवक, लिपिक आदी कर्मचाऱ्यांवरच कारवाईसाठी आहे का? असा खोचक सवाल मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी उपस्थित केला आहे.

सावंतवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांना रायगड लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने जिल्हाच्या पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी वैभववाडी येथे देखील ठाणे लाचलुचपत विभागाने अशा पद्धतीची कारवाई केली होती. मात्र या दोन्ही कारवायांमुळे सिंधुदुर्ग लाचलुचपत उपविभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्ह्यातील लाचलुचपत विभाग कार्यालय फक्त “नाव मोठे लक्षण खोटे” अशाप्रकारे असल्याची प्रचिती मिळाल्याची चर्चा जिल्ह्यातील जनतेत आहे.

जिल्ह्यात लाचलुचपत विभागामार्फत फक्त तलाठी, ग्रामसेवक, लिपिक अशा कर्मचाऱ्यांवरच कारवाई होताना दिसते. मात्र पोलीस, महसूल, बांधकाम, शिक्षण अशा विभागातील भ्रष्टाचारी मोठे मासे गळाला कधीच का लागत नाहीत असा थेट सवाल उपस्थित होतो. भ्रष्टाचाराने त्रस्त पीडित स्थानिक जनता लाचलुचपतच्या ठाणे, रायगड कार्यालयाकडे आपली व्यथा मांडतात, याचाच अर्थ जनतेचा जिल्ह्यातील लाचलुचपत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विश्वास राहिला नाही असेच यावरून सिद्ध होते. स्थानिक जनतेची मोठ्या माशांकडून राजरोसपणे पिळवणूक चालू असून लाचलुचपत विभागाच्या जिल्ह्यातील कार्यालयाला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याची खोचक टीका मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी केला आहे.

Web Title: Sindhudurg sawantwadi raigad thane maharashtra police sawantwadi police government of maharashtra taluka president prasad gawde mns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2023 | 05:50 PM

Topics:  

  • Government of Maharashtra
  • political party
  • Sawantwadi
  • thane

संबंधित बातम्या

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत
1

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार
2

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार

Thane Crime: ठाण्यात धक्कादायक घटना; महापालिकेच्या महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या
3

Thane Crime: ठाण्यात धक्कादायक घटना; महापालिकेच्या महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.