Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: दहीहंडीपूर्वी ‘ठाण्याचा राजा’चा दमदार सराव; ९ थरांची यशस्वी सलामी देत रचला इतिहास

दहीहंडीचा सण काही दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे सर्वच गोविंदा पथकाचा सराव सुरू आहे. अशातच ठाण्यामध्ये माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांच्या पुढाकारातून सराव दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये ठाण्याचा राजा पथकाने ९ थरांची यशस्वी सलामी दिली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 24, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • दहीहंडीपूर्वी ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने सरावादरम्यान ९ थरांची यशस्वी सलामी दिली
  • नऊ थर उभारण्याचे ध्येय पथकाने केले होते निश्चित
  • गोविंदा पथकामध्ये नव्या उत्साहाचे वातावरण
 

 

५ सप्टेंबर रोजी दहीहंडीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ठाण्यामध्ये माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांच्या पुढाकाराने शनिवारी ठाण्यात सराव दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने नऊ थर लावत सलामी दिली.

ठाण्यातील प्रसिद्ध ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सरावादरम्यान पाचपखाडी, नामदेववाडी नाका येथे तब्बल ९ थरांची यशस्वी सलामी देत इतिहास रचला. गेल्या अनेक वर्षांपासून सरावाच्या ठिकाणी ९ थर उभारण्याचे पथकाचे स्वप्न होते. शनिवारी रात्री हे स्वप्न साकार झाल्याने पथकातील गोविंदांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला. गेल्या कित्येक महिन्यांपासून पथकातील युवक दिवसभर काम करून रात्री उशिरापर्यंत सराव करत होते. यंदाच्या सरावाच्या सुरुवातीलाच ९ थर उभारण्याचा संकल्प पथकाने केला होता. त्यासाठी गोविंदांनी अथक मेहनत घेतली. अखेर शनिवारी रात्री ९ थरांची यशस्वी उभारणी करत पथकाने आपला संकल्प पूर्ण केला.

Navi Mumbai News: महापे एमआयडीसीतील 3 डेअरींवर FDAचा छापा; 12 लाखांहून अधिक किमतीचे दूध-दुग्धजन्य पदार्थ जप्त

माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांचा पुढाकार

माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या गोविंदा पथकाने ठाण्यातील दहीहंडी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवात ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने पहिल्यांदा ८ थर उभारण्याचा विक्रम केला होता. या कामगिरीनंतर पथकाला ठाण्यात विशेष ओळख मिळाली.

गोविंदांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण

मात्र, मध्यंतरीच्या काळात पथकाच्या वाटचालीला काहीशी मरगळ आली होती. त्यानंतर परिसरातील युवकांनी एकत्र येत पथकाची धुरा आपल्या खांद्यावर घेत पुन्हा नव्या जोमाने सरावाला सुरुवात केली. पथकासाठी जोशपूर्ण गीत तयार करण्यात आले, तसेच आकर्षक टी-शर्टही तयार करण्यात आले. त्यामुळे गोविंदांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Mira Bhayandar Fire Brigade: अग्निशमन दलाच्या मदतीला ‘फायर फायटिंग ड्रोन’; उंच इमारतींतील आगीवर नियंत्रणाचा नवा प्रयोग

नऊ थर उभारण्याचे ध्येय पथकाने केले होते निश्चित

गेल्यावर्षी ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने विविध दहीहंडी उत्सवांमध्ये ९ थरांची यशस्वी उभारणी केली होती. मात्र, ज्या ठिकाणी पथकाचा सराव होतो, त्या कर्मभूमीवर ९ थर उभारण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झाले नव्हते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यंदा सरावाच्या सुरुवातीपासूनच ९ थर उभारण्याचे ध्येय पथकाने निश्चित केले होते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

Web Title: Thane thanyacha raja govinda pathak successful 9 thar salami

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Dahi Handi
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Bhiwandi Ramleela: रावणाच्या जुलूमशाहीचे थरारक सादरीकरण; रामलीलेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू
1

Bhiwandi Ramleela: रावणाच्या जुलूमशाहीचे थरारक सादरीकरण; रामलीलेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण
2

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा
3

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार
4

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.