Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंधुदुर्ग बनणार जागतिक दर्जाचे टुरिझम हब! ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक

सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनवण्यासाठी 'वन स्टेट, वन डेस्टिनेशन' उपक्रमाची प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 20, 2026 | 05:00 PM
सिंधुदुर्ग बनणार जागतिक दर्जाचे टुरिझम हब! ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक
Follow Us
Follow Us:
  • सिंधुदुर्ग बनणार जागतिक दर्जाचे टुरिझम हब!
  • ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक
  • वाचा सविस्तर बातमी!
सिंधुदुर्ग, दि. २० जुलै २०२६: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक नियोजन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन क्षमता अधिक व्यापक पातळीवर विकसित करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीमध्ये पर्यटनस्थळांची निवड, आवश्यक पायाभूत सुविधा, पर्यटकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पर्यटन माहिती केंद्रे, डिजिटल प्रचार, स्थानिक कला, खाद्यसंस्कृती, पर्यटन सर्किटची निर्मिती, स्थानिक पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग तसेच लोकसहभाग यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से) यांनी सांगितले की, “सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, ग्रामीण पर्यटन आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा संगम आहे. ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्याची पर्यटन ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे.”

पर्यटकांसाठी खुशखबर! सिंधुदुर्गात देशातील पहिल्या पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात, 2027 मध्ये पूर्ण होणार काम

पर्यटन संचालनालयाचे संचालक श्री. मंगेश जोशी (भा.प्र.से) म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा पर्यावरणपूरक विचार करून योग्य पद्धतीने विकास करणे हे ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच या माध्यमातून आवश्यक पायाभूत सुविधा, प्रभावी ब्रँडिंग आणि स्थानिक लोकसहभागाला प्राधान्य दिले जाईल. यामुळे स्थानिक रोजगार, उद्योजकता आणि आर्थिक विकासाला निश्चितच चालना मिळेल. प्राथमिक नियोजनानंतर संबंधित विभागांकडून सविस्तर प्रस्ताव प्राप्त करून व्यापक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.”

बैठकीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, आरती देसाई, पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर, पर्यटन संचालनालयाचे कार्यकारी अभियंता आकाश चकोर, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनीही बैठकीत सहभाग घेत पर्यटन विकासासाठी नाविन्यपूर्ण सूचना मांडल्या.

सर्व कामे दर्जेदार अन् वेळेत पूर्ण करा, कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर…; नितेश राणे यांचे निर्देश

Web Title: Sindhudurg tourism development one state one destination meeting held by collector trupti dhodmise marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • kokan
  • Sindhudurg
  • Sindhudurg News
  • tourism

संबंधित बातम्या

Maharashtra News: ‘शाळा वाचवा’साठी पालकांचा एल्गार! गावराई–सुकळवाड पालकांचे माध्यमिक शिक्षण विभागासमोर आंदोलन
1

Maharashtra News: ‘शाळा वाचवा’साठी पालकांचा एल्गार! गावराई–सुकळवाड पालकांचे माध्यमिक शिक्षण विभागासमोर आंदोलन

रेकॉर्डब्रेक पावसाचा माथेरानला फटका, शारलोट लेक ते सनसेट पॉईंट रस्ते खराब,पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेचा महत्त्वाचा निर्णय
2

रेकॉर्डब्रेक पावसाचा माथेरानला फटका, शारलोट लेक ते सनसेट पॉईंट रस्ते खराब,पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेचा महत्त्वाचा निर्णय

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या
3

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
4

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.