कल्याण : बारावे ट्रान्स्फर स्टेशन (Barave Transformer Station) येथे लागलेल्या आगीच्या धुरामुळे (Fire Smoke) परिसरातील नागरिकांना श्वसनास त्रास होत असून मागील २ दिवसांपासून परिस्थिती गंभीर झाली आहे. बारावे गावात कल्याण डोंबिवली महापालिकेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र आहे (There is solid waste processing center of kdmc in barave village).
[read_also content=”एनआरसी कंपनीच्या जागेत सुरू असलेले शेडचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात? आमदार विश्वानाथ भोईर यांनी दिले पत्र https://www.navarashtra.com/maharashtra/ongoing-construction-of-shed-in-the-premises-of-nrc-company-in-the-midst-of-controversy-letter-given-by-mla-viswanath-bhoir-nrvb-375595.html”]
या ठिकाणी कचऱ्याचा भला मोठा ढीग असून त्याला शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण करत मोठ्या प्रमाणावर कचरा गिळंकृत केला. दरम्यान या आगीच्या घटनेमुळे बारावे, गांधारी आणि आसपासच्या परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते (There was a huge plume of smoke). आज तिसऱ्या दिवशी देखील ही आग धुमसत असल्याने या आगीच्या धुरामुळे येथील परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती स्थानिक नागरिक सुनील घेगडे यांनी दिली.