Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: मनपा क्षयरोग विभागात खळबळ! डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी; कर्मचारी संघटनांचा कामबंदचा इशारा

सोलापूर महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांच्यावर कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा आरोप करत कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 10, 2026 | 07:16 PM
मनपा क्षयरोग विभागात खळबळ! डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी

मनपा क्षयरोग विभागात खळबळ! डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:
  • मनपा क्षयरोग विभागात खळबळ!
  • डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी
  • कर्मचारी संघटनांचा कामबंदचा इशारा
सोलापूर : शहर प्रतिनिधी: महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांच्यावर कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणे, अपमानास्पद वागणूक देणे आणि असंवेदनशीलपणे वागल्याचे गंभीर आरोप होत आहेत.या प्रकरणामुळे महापालिकाआरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. विविध कर्मचारी संघटनांनी डॉ. हराळकर यांच्या तात्काळ बदलीसह शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, ट्रीटमेंट सुपरवायझर सचिन मस्के यांना गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाचा सामना करावा लागत होता. या तणावातूनच त्यांची प्रकृती बिघडून ते अधिकाऱ्यांच्या दालनातच कोसळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करावे लागले. या घटनेनंतर संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

एनएचएम कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा विजया कांबळे यांनी डॉ. हराळकर यांच्यावर कर्मचाऱ्यांचा वारंवार अपमान केल्याचा आरोप केला. कर्मचाऱ्यांना नासके कांदे हत्ती” आणि बिनकामाचे अशा शब्दांत हिणवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. सचिन मस्के यांची प्रकृती बिघडल्यानंतरही वैद्यकीय अधिकारी म्हणून आवश्यक मदत करण्याऐवजी त्यांची खिल्ली उडविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

सोलापूर महापालिकेच्या डिजिटल क्रांतीला वेग, आयटी तज्ज्ञांशी विनामूल्य करार, तब्बल 6 कोटींची बचत

कामगार नेते जनार्दन शिंदे यांनीही डॉ. हराळकर यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मस्के यांना चक्कर आल्यानंतर हे ढोंग करत आहेत अशी टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारचे वर्तन संवेदनशील आरोग्य व्यवस्थेला शोभणारे नसल्याचे त्यांनी म्हटले. तर कामगार नेते बापू सदाफुले यांनी दोन वेळा बदलीचे आदेश होऊनही त्यांची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेवरही टीका केली.

गेल्या अडीच वर्षांपासून मी विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळत आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामुळे कामाचा ताण वाढला आहे. कामाबाबत शिस्त लावल्यामुळे काहींना ते रुचत नाही. मी कोणालाही अपमानास्पद वागणूक दिलेली नाही. डॉ. अरुंधती हराळकर – क्षयरोग अधिकारी

कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळाने महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेत, नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तडवळकर आणि आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांची भेट घेतली. सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावर महापौर कोंड्याल यांनी दहा दिवसांच्या आत नियमानुसार चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

Karmala News: इंदापूरला आठ तास वीज, करमाळ्यालाच चार तास का? शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा; आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी

Web Title: Solapur municipal corporation employees protest against tb officer dr arundhati haralkar demand transfer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

सोलापूरच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाला हिरवा कंदील; ३ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार
1

सोलापूरच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाला हिरवा कंदील; ३ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार

वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर
2

वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर

जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका
3

जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम!
4

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.