Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: सोशल मीडियाची ताकद पुन्हा सिद्ध! व्हॉट्सअॅप स्टेटस ठरलं देवदूत; सोशल मीडियाच्या मदतीने हरवलेली चिमुकली सुखरूप सापडली

Solapur News: मोहोळमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस आणि सोशल मीडियाच्या मदतीने हरवलेली पाच वर्षीय चिमुकली काही तासांत सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आली. मोहोळ पोलिसांच्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 07, 2026 | 11:50 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे लागला चिमुकलीचा शोध
  • मोहोळ पोलिसांची समयसूचकता
  • सोशल मीडियाचा सकारात्मक वापर ठरला वरदान
Solapur News: मोहोळ : सोशल मीडियाचा जबाबदारीने आणि सकारात्मक वापर केल्यास तो संकटाच्या काळात किती प्रभावी ठरू शकतो, याचा प्रत्यय मोहोळमध्ये आला. व्हॉट्सअॅप स्टेटसच्या मदतीने मोहोळ पोलिसांनी अवघ्या पाच वर्षांच्या हरवलेल्या चिमुकलीला काही तासांत तिच्या पालकांपर्यंत सुखरूप पोहोचवले.

बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असताना वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी सिद्धेश्वर बाबर यांच्या निदर्शनास एक पाच वर्षांची चिमुकली घाबरलेल्या अवस्थेत एकटीच फिरताना आली. त्यांनी तातडीने तिला सुरक्षितपणे पोलिस चौकीत आणले. चिमुकली घाबरलेली असल्याने पोलिस निरीक्षक दीपक पाटील आणि सिद्धेश्वर बाबर यांनी तिला प्रथम खाऊ देत धीर दिला आणि आपुलकीने विचारपूस केली.

व्हॉट्सअॅप स्टेटस ठरलं देवदूत

चिमुकलीला घराचा पत्ता किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक सांगता येत नसल्याने तिच्या पालकांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यावेळी सिद्धेश्वर बाबर यांनी चिमुकलीचा फोटो काढून आवाहनासह तो आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर केला.

काही मिनिटांतच हा फोटो विविध व्हॉट्सअॅप ग्रुप आणि स्थानिक डिजिटल नेटवर्कवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अखेर हे स्टेटस चिमुकलीच्या पालकांपर्यंत पोहोचले आणि तिची आई तातडीने पोलिस चौकीत दाखल झाली.

आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू

आवश्यक खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी चिमुकलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले. मुलीला सुखरूप पाहताच आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू आल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर मोहोळ पोलिसांच्या समयसूचकतेचे, संवेदनशीलतेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘पोलिस हेच जनतेचे खरे मित्र’

पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर बाबर यांनी दाखवलेली तत्परता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला प्रभावी वापर यामुळे हरवलेल्या चिमुकलीला काही तासांतच तिच्या कुटुंबाशी पुन्हा भेट घडली. या घटनेनंतर नागरिकांनी “पोलिस हेच जनतेचे खरे मित्र” असल्याची भावना व्यक्त केली.

Bigg Boss 20 Promo: ‘बिग बॉस 20’चा नवा ट्विस्ट! यंदा घरात नव्हे तर आखाड्यात रंगणार खेळ? प्रोमोने वाढवली उत्सुकता

ही घटना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर केल्यास तो केवळ संवादाचे माध्यम न राहता संकटात मदतीचा हात ठरू शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण ठरली.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘प्राइम फोकस स्टुडिओज’चे उद्घाटन; जागतिक मनोरंजन उद्योगासाठी मुंबई सज्ज

Web Title: Solapur news missing girl found through whatsapp status social media mohol police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Solapur News
  • Solapur Police
  • WhatsApp Status

संबंधित बातम्या

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
1

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.