Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : नालेसफाई घोटाळ्याला नवा ट्विस्ट ८० लाखांच्या अतिरिक्त बिलांवरून महापालिका प्रशासन घेरले; सभागृहातील खुलासा आणि कागद

Solapur News : महानगरपालिकेतील कथित नालेसफाई घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नगर अभियंता कार्यालयाने केलेल्या पत्रव्यवहारातून सभागृहात करण्यात आलेल्या खुलाशालाच विरोधाभास निर्माण झाल्याचा दावा नगरसेवक अनंत जाधव यांनी केला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 07, 2026 | 09:26 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सभागृहाची दिशाभूल झाली का?
  • ८० लाखांच्या बिलांवरून प्रश्नचिन्ह
Solapur :  माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी तीन मक्तेदारांना सुमारे ८० लाख रुपयांची अतिरिक्त बिले अदा करण्यात आल्याचा आरोप करत नवे पुरावे सादर केले आहेत.यापूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक अनंत जाधव यांनी लक्षवेधीद्वारे नालेसफाईच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. तसेच काही मक्तेदारांना अतिरिक्त बिले देण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता.

आदिनाथ साखर कारखान्याच्या लिलावाला नारायण पाटीलांचा विरोध; ‘रक्त सांडू पण आदिनाथ विकू देणार नाही’

त्यावेळी नगर अभियंता सरिका आकुलवार यांनी सभागृहात खुलासा करताना कोणत्याही मक्तेदाराला अतिरिक्त किंवा जादा बिल अदा करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या पत्रव्यवहारातील कागदपत्रांमध्ये तीन मक्तेदारांना अतिरिक्त बिले अदा झाल्याची बाब नमूद असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. या अतिरिक्त रकमेची वसुली करण्यासाठी महापालिका आयुक्तांची परवानगी मागण्यात आल्याचेही कागदपत्रांमधून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सभागृहातील अधिकृत माहिती आणि कार्यालयीन नोंदी यामध्ये तफावत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Solapur News: सोशल मीडियाची ताकद पुन्हा सिद्ध! व्हॉट्सअॅप स्टेटस ठरलं देवदूत; सोशल मीडियाच्या मदतीने हरवलेली चिमुकली सुखरूप सापडली

सभागृहाची दिशाभूल झाली का?

नालेसफाई प्रकरणात समोर आलेल्या नव्या कागदपत्रांमुळे सभागृहाची दिशाभूल करण्यात आली का, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित अधिकारी व मक्तेदारांची जबाबदारी निश्चित करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नगरसेवक अनंत जाधव यांनी नालेसफाई कामातील आर्थिक अनियमिततेबाबत आणखी काही महत्त्वाचे पुरावे लवकरच सादर करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आधीच वादग्रस्त ठरलेले नालेसफाई प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.

८० लाखांच्या बिलांवरून प्रश्नचिन्ह

माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांचा आधारतीन मक्तेदारांना अतिरिक्त बिले दिल्याचा आरोपअतिरिक्त रक्कम वसुलीसाठी परवानगी मागितल्याचा दावासभागृहातील खुलासा आणि कार्यालयीन नोंदीत विसंगती असल्याचा आरोप केला आहे.

Solapur News : दिव्यांगांना मिळाली श्रद्धेची पॉवर , महापालिकेचा मोठा दिलासा

अनंत जाधव, नगरसेवक पुढे असे म्हणाले , महापालिकेच्या आर्थिक व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. सभागृहातील खुलासा आणि कार्यालयीन कागदपत्रांमधील विसंगतीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

Web Title: Solapur news new twist to drain cleaning scam municipal administration surrounded by additional bills of 80 lakhs disclosure and papers in the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • Solapur Municipal Corporation
  • Solapur News
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

Solapur News: सोशल मीडियाची ताकद पुन्हा सिद्ध! व्हॉट्सअॅप स्टेटस ठरलं देवदूत; सोशल मीडियाच्या मदतीने हरवलेली चिमुकली सुखरूप सापडली
1

Solapur News: सोशल मीडियाची ताकद पुन्हा सिद्ध! व्हॉट्सअॅप स्टेटस ठरलं देवदूत; सोशल मीडियाच्या मदतीने हरवलेली चिमुकली सुखरूप सापडली

सोलापूर महापालिकेत नालेसफाई घोटाळ्यावरून रणकंदन! भाजप नगरसेवक अनंत जाधव आक्रमक; नगरअभियंत्यांच्या राजीनाम्याची मागणी
2

सोलापूर महापालिकेत नालेसफाई घोटाळ्यावरून रणकंदन! भाजप नगरसेवक अनंत जाधव आक्रमक; नगरअभियंत्यांच्या राजीनाम्याची मागणी

Solapur Manpa Scam: निवडणूक खर्चातील फुगवलेल्या बिलांची चौकशी रखडली! कागदपत्रांअभावी सुनावणी तहकूब, उपमहापौरांची कारवाईची मागणी
3

Solapur Manpa Scam: निवडणूक खर्चातील फुगवलेल्या बिलांची चौकशी रखडली! कागदपत्रांअभावी सुनावणी तहकूब, उपमहापौरांची कारवाईची मागणी

Solapur News : शिवरत्न हटवून ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’; जिल्हा परिषदेत ठराव मंजूर
4

Solapur News : शिवरत्न हटवून ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’; जिल्हा परिषदेत ठराव मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.