• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sooraj Pancholi Acquittal In Jiah Khan Suicide Case Nrka

सुरज पांचोलीची निर्दोष मुक्तता; जिया स्वतःच्या भावनांवर आवर घालण्यास अपयशी; सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाचे निरीक्षण

दिवंगत बॉलीवूड अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) स्वतःच्या भावनांवर आवर घालण्यास अपयशी ठरली त्यासाठी सुरज पांचोलीला (Sooraj Pancholi) जबाबदार ठरवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवून जियाच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीची विशेष न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष सुटका केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 28, 2023 | 08:16 PM
सुरज पांचोलीची निर्दोष मुक्तता; जिया स्वतःच्या भावनांवर आवर घालण्यास अपयशी; सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाचे निरीक्षण
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : दिवंगत बॉलीवूड अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) स्वतःच्या भावनांवर आवर घालण्यास अपयशी ठरली त्यासाठी सुरज पांचोलीला (Sooraj Pancholi) जबाबदार ठरवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवून जियाच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीची विशेष न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष सुटका केली.

कोणत्याही मुलीने आत्महत्या करणेह दुदैवी आहे. याप्रकऱणी जिया तिच्या भावनांचा बळी पडली होता. ती तिच्या भावनांना आवर घालू शकली नाही. ती त्यांच्या नातेसंबंधातून अकडूनच राहिली त्यातून बाहेर पडू शकली असती. पण तसे झाले नाही. जिया तिच्या भावनांना बळी पडली यासाठी आरोपीला (सुरज) जबाबदार धरता येणार नाही. तसेच आरोपीविरोधातील पुरावे हे संदिग्ध, साधारण आहेत. जियाला आत्महत्या करण्यास सुरजने भाग पाडले असे सिद्ध कऱणारे कोणतेही ठोस पुरावे याचिकाकर्ते मांडू शखले नाहीत, असे निरीक्षण विशेष न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी ५१ पानी आदेशात नोंदवले.

जिया खानने ३ जून २०१३ रोजी आत्महत्या केली होती. जियाने अभिनेता सूरज पांचोलीसोबतच्या तिच्या नात्याचे वर्णन करणारे ६ पानांचे मृत्यूपत्र लिहिले होते. याच आधारे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांनी सुरज पांचोलीला अटक केली होती. १ जुलै २०१३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सुरजची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर जियाची आई राबिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) किंवा केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. आपल्या मुलीचा मृत्यू आत्महत्येने झाला नसून हत्या झाल्याचा दावा त्यांनी केला होता. २०१४ रोजी उच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे वर्ग केला. डिसेंबर २०१५ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात सीबीआयने पंचोलीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. त्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांसमोर मार्च २०१९ मध्ये प्रकरणाची सुनावणी सुरू झाली सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून २० एप्रिल रोजी निकाल राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी न्यायालयाने जाहीर केला.

सुरजने जियाला नैराश्यातून बाहेर येण्यास मदत केली

पांचोलीने जियाला नैराश्यातून बाहेर येण्यास याआधी मदत केली होती, परंतु दुर्दैवी घटनेदरम्यान, तो कामात व्यग्र होता. त्यामुळे तो जियाला वेळ देऊ शकला नाही, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आणि जियाची आई आणि मुळ तक्रारदार राबिया यांच्या परस्परविरोधी विधानांवर शंका उपस्थित केली. त्यांनी प्रकरण आत्महत्येचे असतानाही हत्या असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी काही पुरावेही सादर केले. तज्ज्ञांनी जियाच्या मृत्यूचे कारण आत्महत्या सांगितले होते. मात्र राबिया यांनी परस्परविरोधी केलेल्या तक्रारीमुळे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांवरही संशय निर्माण झाला होता. राबिया यांनी स्वतः व्यतिरिक्त सर्वांवरच शंका उपस्थित केल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. तसेच २००८ मध्येही जिया तणावात होती आणि त्यावर उपचार घेत होती. याआधीही जियाने आत्महत्या करण्याच प्रयत्न केला होता त्यावेळी सुरजनेच डॉक्टरांना बोलवून नैरश्यातून बाहरे काढले होते. याकडेही दुलर्क्ष करून चालणार नाही. असेही आदेशात म्हटले आहे.

पत्रावरही न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

सीबीआय न्यायालयाने जियाने लिहिलेल्या कथित पत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिया आणि सुरजाच्या बिघडलेल्या नात्याबद्दल याआधी त्यांनी कोणाकडेही तक्रार केली नव्हती. जियाच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी राबियाला तिच्या स्वत:च्या दैनंदिनीत कथित पत्र `अचानक” सापडल्याचे न्यायालयाने नमूद केले. पुढे, जेव्हा हे पत्र चौकशीसाठी मागितले तेव्हा राबियाने ते देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी ते माध्यमांमध्ये प्रकाशित केले. मृत्यूच्या ४ दिवसानंतर हे पत्र सापडल्याच्या प्रश्नावर राबियांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे कथित पत्राच्या मूळ अथवा खऱ्या कर्त्याबाबत (लिहिणाऱ्या व्यक्ती) गंभीर संशय निर्माण होतो असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

राबियांच्या वागणुकीवरही शंका

राबियाच्या म्हणण्यानुसार, जिया एक आनंदी मुलगी होती, तिच्या बॉलीवूड कारकिर्दीसाठी आनंदी होती आणि ती कधीही आत्महत्या करू शकत नाही. तथापि, जियाला कधीही मोठा बॅनरचा चित्रपट मिळाला नाही. ती चित्रपटसृष्टीत चांगल्या भूमिकेसाठी झगडत होती. तिने केलेल्या कामाबद्दल आनंदी नव्हती, असे जियासोबत चित्रपटात काम करणाऱ्यांनी नोंदवलेल्या जबाबामध्ये सांगितले होते. दुसरीकडे, जियाच्या मृत्यूनंतर लगेचच राबियाने तिच्या दुसऱ्या मुलीचे मुंबई येथे लग्न पार पाडले. अशा दुःखाच्या परिस्थितीत देखील असा सोहळा साजरा करणे ही वागणूक एखाद्या सामान्य व्यक्तीसारखी दिसत नाही, असेही न्यायालयाने आदेशात अधोरेखित केले आहे.

Web Title: Sooraj pancholi acquittal in jiah khan suicide case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2023 | 08:16 PM

Topics:  

  • Court Decision
  • Jiah Khan Suicide Case
  • Mumbai
  • Sooraj Pancholi
  • Suicide case

संबंधित बातम्या

चॉकटेलटच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला धडा शिकवत कोर्टाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

चॉकटेलटच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला धडा शिकवत कोर्टाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
3

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
4

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nanded Crime: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, मित्राच्या रूमवर गेली आणि…; नेमकं प्रकरण काय?

Nanded Crime: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, मित्राच्या रूमवर गेली आणि…; नेमकं प्रकरण काय?

Nov 19, 2025 | 10:08 AM
थंडीमुळे त्वचा खूप जास्त काळी झाली आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून चेहऱ्यावर आणा नैसर्गिक ग्लो, कायमच दिसाल सुंदर

थंडीमुळे त्वचा खूप जास्त काळी झाली आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून चेहऱ्यावर आणा नैसर्गिक ग्लो, कायमच दिसाल सुंदर

Nov 19, 2025 | 10:04 AM
जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO

जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO

Nov 19, 2025 | 10:03 AM
NFSA Update: सरकारचा मोठा निर्णय! मोफत रेशन योजनेत मोठी कारवाई..; 2.25 कोटी अपात्र लाभार्थ्यांची वगळली नावे

NFSA Update: सरकारचा मोठा निर्णय! मोफत रेशन योजनेत मोठी कारवाई..; 2.25 कोटी अपात्र लाभार्थ्यांची वगळली नावे

Nov 19, 2025 | 10:02 AM
International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

Nov 19, 2025 | 09:59 AM
Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं

Nov 19, 2025 | 09:46 AM
Margashirsha Amavasya 2025: अमावस्येपूर्वी ओळखा ‘हे’ अशुभ संकेत, तुमच्यावर पितरे नाराज तर नाहीत ना?

Margashirsha Amavasya 2025: अमावस्येपूर्वी ओळखा ‘हे’ अशुभ संकेत, तुमच्यावर पितरे नाराज तर नाहीत ना?

Nov 19, 2025 | 09:37 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.