Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : तुषार दोशी ‘दोषी’ नाहीच? निलंबन टाळून सातारा पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावरुन झालेल्या राड्यावरुन सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले होते. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई टळली असून ते कामावर रुजू झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 26, 2026 | 03:47 PM
SP Tushar Doshi resumes duty following the Satara Zilla Parishad President election Fighting case

SP Tushar Doshi resumes duty following the Satara Zilla Parishad President election Fighting case

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन राजकारण
  • सातारा पोलीस अधीक्षकांवरील निलंबनाची कारवाई रद्द
  • तुषार दोशी पुन्हा कामावर रुजू
Satara News : सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राज्यामध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला. साताऱ्यातील या वादाचे पडसाद हे अगदी विधीमंडळामध्ये देखील दिसून आले. साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. या प्रकरणामुळे शिंदेंच्या आमदारांची गळचेपी सुरु असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणामध्ये सातारा (Satara News) पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी करण्यात आली. मात्र हे निलंबन टळले असून ते पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

 

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या प्रकारावरुन विधीमंडळामध्ये देखील आक्रमक भूमिका घेण्यात आली. आमदार आणि मंत्र्यांना झालेली धक्काबुक्की हा निंदनीय प्रकार असून यावरुन पोलीस अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाचे आदेश दिले होते. ते. मात्र, अधिवेशनाच्या शेवटच्यादिवशी सभापती राम शिंदे यांनी उपसभापतींचा आदेश रद्द करत सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीचे चौकशीचे आदेश दिले आहेत.

हे देखील वाचा : झिरवळांना अडकवण्यासाठी कुणी सापळा रचला; वडेट्टीवारांचा विधानसभेत लेटरबॉम्ब

दरम्यान, निलंबनाचा आदेश रद्द करण्यात आल्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक हे कार्यालयामध्ये कामावर रुजू झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची चौकशी केली जाईल असे सांगितले. तसेच, सभापती, उपसभापती आणि तालिका अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भातही त्यांनी कायदेशीर बाजू तपासण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्यातच, अधिवेशनाच्या शेवटच्यादिवशी सभापती राम शिंदे यांनी नीलम गोऱ्हेंनी दिलेले आदेश रद्द केले. या घटनेनंतर आता सातारा पोलिस अधीक्षक दोशी हे आज दोन दिवसांनंतर पोलिस मुख्यालयात हजर झाले आहेत. त्यामुळे, त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली किंवा त्यांचे निलंबन झालेच नाही, हे स्प्ट झालं आहे.

हे देखील वाचा : साताऱ्याच्या राड्यामुळे सरकार धोक्यात? शिंदे गटाच्या नेत्यांकडून राजीनाम्याचा इशारा

सातारा जि.प. अध्यक्षपद निवडणुकीबाबत सत्ताधाऱ्यांतच जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याचे चित्र होते. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाची शिंदे गटाची मागणी होती. तर, या निर्णयाला भाजप मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. या सर्व घडामोडींमुळे सत्ताधारी आघाडीतच अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे स्पष्ट झाले. या मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधाऱ्यांमध्येच वाद पेटला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणाबाजी करत निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली. तर गोरे यांनी निलंबन मागे घेण्याचा आग्रह धरला होता.

 

Web Title: Sp tushar doshi resumes duty following the satara zilla parishad president election fighting case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • Satara News
  • Shambhuraj Desai
  • Tushar Doshi

संबंधित बातम्या

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
1

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
2

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप
3

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
4

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.