Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?

जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित 251 पूर्णतः  व 31 अंशतः बाधित तालुक्यातील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 11, 2025 | 05:50 PM
Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?
Follow Us
Close
Follow Us:

राज्यात जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी
अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान,
आपद्ग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना रुपये चार लाख

मुंबई: राज्यात जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 251 तालुके पूर्णतः  तर 31  तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू केल्या आहेत. तसेच आपद्ग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन वाहून जाणे, घरांची पडझड, जनावरांची हानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या सर्व आपद्ग्रस्तांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने हे विशेष पॅकेज लागू केले आहे. या विशेष पॅकेजमुळे बाधित पिके, शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित 251 पूर्णतः  व 31 अंशतः बाधित तालुक्यातील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात आले. जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत 26.69 लाख हेक्टर तर सप्टेंबर 2025 मध्ये जवळ जवळ 39 लाख हेक्टर अशा सुमारे 65 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेत पिकांचे नुकसान झाले असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

आर्थिक साहाय्य – आपद्ग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना रुपये चार लाख, अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास रुपये 74 हजार, 60 टक्के पेक्षा अधिक अपंगत्व आल्यास 2 लाख 50 हजार, जखमी व्यक्ती रूग्णालयात  एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी दाखल झाला असल्यास 16 हजार,  एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल असल्यास  5 हजार 400 रुपये.

घरांसाठी मदत – पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या /कच्च्या घरांसाठी- सपाट भागातील प्रती घर रुपये 1 लाख 20 हजार तर डोंगराळ भागातील घरांसाठी 1 लाख 30 हजार, अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी (किमान 15 टक्के) पक्क्या घरांसाठी प्रती घर 6 हजार 500 रुपये, कच्च्या घरांसाठी प्रती घर चार हजार रुपये, प्रती झोपडी आठ हजार रुपये, प्रती गोठा तीन हजार रुपये.

मृत जनावरांसाठी – दुधाळ जनावरांसाठी प्रती जनावर 37 हजार 500 रुपये,  ओढकाम करणाऱ्या जनावरासाठी प्रती जनावर 32 हजार रूपये, लहान जनावरासाठी प्रती जनावर 20 हजार रूपये, शेळी मेंढी प्रती जनावर चार हजार रुपये आणि प्रती कोंबडी 100 रुपये.

शेतीपिकांचे नुकसान – प्रति हेक्टर 8 हजार 500 रुपये (तीन हेक्टर मर्यादेत), आश्वासित सिंचनाखालील (बागायत) पिकासाठी प्रती हेक्टर 17 हजार (तीन हेक्टर मर्यादेत), आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रती हेक्टर 22 हजार 500 रुपये (तीन हेक्टर मर्यादेत).

Web Title: Special relief package concessions applicable for disaster hit talukas said by minister makarand jadhav patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • Crop damage
  • Farmers
  • Heavy Rain
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Mahayuti Government: बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध युद्धाची हाक! फडणवीस सरकारकडून लाखो प्रमाणपत्रे रद्द
1

Mahayuti Government: बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध युद्धाची हाक! फडणवीस सरकारकडून लाखो प्रमाणपत्रे रद्द

Ahilyangar News: शेतकरी पुन्हा अडचणीत! रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ
2

Ahilyangar News: शेतकरी पुन्हा अडचणीत! रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ

“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद
3

“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद

Ratnagiri News: मनुष्यबळाची कमतरता; मात्र भातशेतीची ओढ कायम
4

Ratnagiri News: मनुष्यबळाची कमतरता; मात्र भातशेतीची ओढ कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.