Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dattatray Bharane: “… यात कोणतीही तडजोड करू नये”; क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

अद्ययावत जिम्नॅशियम सुविधा, प्रशासकीय इमारत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, रेनवॉटर हार्वेस्टिंग, ग्रीन बिल्डींग अशा सुविधा उपलब्ध करून क्रीडा सुविधांचे “नागपूर स्पोर्ट्स हब" उभारण्यात येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2025 | 10:32 PM
Dattatray Bharane: “… यात कोणतीही तडजोड करू नये”; क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: नागपूर, मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात वसतीगृह, अद्ययावत जिम्नॅशियम सुविधा, प्रशासकीय इमारत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, रेनवॉटर हार्वेस्टिंग, ग्रीन बिल्डींग अशा सुविधा उपलब्ध करून क्रीडा सुविधांचे “नागपूर स्पोर्ट्स हब” उभारण्यात येत आहे. हे स्पोर्ट्स हब पूर्णत्वाला नेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केले. त्याचबरोबर “नागपूर स्पोर्ट्स हब” ची उभारणी विहित वेळेत करावी, कामचा दर्जा, गुणवत्ता यात कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देशही मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

आज मंत्रालयात “नागपूर स्पोर्ट्स हब”उभारणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार, उपअभियंता प्रशांत शंकरपुरे, वास्तूविशारद नुपूर वैद्य, नम्रता शेट्टी उपस्थित होते. मंत्री दत्तात्रय भरणे  म्हणाले की, नागपूर, मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात विशेष महत्त्वपूर्ण सुविधा तसेच स्पोर्ट्स कन्व्हेंशन सेंटर, क्रीडा विद्यापीठाशी संलग्नीत कोर्सेससाठी अॅकेडमी सुरु करुन त्यात स्पोर्ट्स मीट, स्पोर्ट्स फिजीयोथेरेपी, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, स्पोर्ट्स इव्हेंट, स्पोर्ट्स कोचींग इत्यादी कोर्सेस सुरु करुन खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील करीयरची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आज मंत्रालयात “नागपूर स्पोर्ट्स हब"उभारणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. नागपूर, मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात विशेष महत्त्वपूर्ण सुविधा तसेच स्पोर्ट्स कन्व्हेंशन सेंटर, क्रीडा विद्यापीठाशी संलग्नीत कोर्सेससाठी अॅकेडमी सुरु करुन त्यात स्पोर्ट्स मीट, स्पोर्ट्स… pic.twitter.com/vIk7UCH2LS — Dattatray Bharane (@bharanemamaNCP) February 24, 2025

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी विशेष इनोव्हेटिव्ह स्पोर्ट्स स्कूलची उभारणी करण्यात येत आहे. स्पोर्ट्स इन्फॉरमेशन सेंटर उभारुन नवोदित खेळाडूंना व पालकांना विविध खेळाची अद्ययावत माहिती, शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या विविध योजना, विविध पुरस्कार, शासकीय व खाजगी क्षेत्रातील सेवेच्या संधी इत्यादीबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 6 हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय 3 हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण’ झाले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, वनामतीचे प्रभारी संचालक रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Sports minister dattatreya bharane directions no compromise while setting up nagpur sports hub sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 10:32 PM

Topics:  

  • Dattatray Bharne
  • Mumbai
  • Sports News

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
3

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
4

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.