Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST workers DA : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासादायक निर्णय घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 11, 2026 | 05:13 PM
एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:
  • एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा!
  • महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा
  • ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांना लाभ
  • घरभाडे भत्त्यातही वाढीची घोषणा
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची ऐतिहासिक घोषणा केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई सेंट्रल येथील ‘ वाहतूक भवन ‘ या महामंडळाच्या मुख्यालयात आज राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक व प्रशासकीय मागण्यांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे सर्व कर्मचारी संघटनांना शुभेच्छा देताना, “सामंजस्याची भूमिका घेऊन महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे,” असे आवाहन केले.

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीत खंजीर’, निधी नाकारल्याने राज्यभर संताप; राज्य सरकारच्या भूमिकेवर कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत, भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावाने एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच वेतनवाढीची थकबाकीही आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित करण्यात येईल असे देखील ग्वाही दिली.

बैठकीत कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, सेवाशर्ती, रिक्त पदभरती, बसस्थानक विकास, कल्याणकारी योजना तसेच महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.

कामगार संघटनांशी सातत्याने संवाद साधून प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल, असे सांगताना मंत्री सरनाईक म्हणाले, “महामंडळाच्या सर्व संघटनांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेली समिती तातडीने स्थापन करण्यात यावी. उत्पन्नवाढीसाठी समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.” महामंडळाच्या आधुनिकीकरणा वर भर देताना त्यांनी सांगितले की, आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार नवीन बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली २०३५ पर्यंत एसटीचा ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी राज्यभर आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठीही ठोस उपाययोजना सुरू असल्याचे सांगताना मंत्री सरनाईक यांनी बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर कठोर कारवाईसाठी एसटीच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीमती प्रियंका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरुद्ध धडक मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम एसटीच्या उत्पन्नावाढीवर झाला असून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल असे त्यांनी नमूद केले. “कर्मचारी आणि प्रशासन यांच्या सुसंवादातून एसटी महामंडळ अधिक सक्षम, प्रवासी-केंद्रित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असा विश्वास व्यक्त करत मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका कायम राहील, अशी ग्वाही दिली.

या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियंका नारनवरे, वरिष्ठ अधिकारी, विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच राज्यभरातील कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
” एसटीची आर्थिक घडी सावरत असताना कर्मचाऱ्यांच्या न्याय्य आर्थिक मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करू. संघटनांनी आंदोलन मागे घ्यावे . कृपया, प्रवाशांना वेठीस धरू नये, ही मनापासून विनंती.” अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.

St Mahamandal : आता काय खैर नाही! एसटी स्थानकांभोवती अवैध प्रवासी वाहतुकीवर राज्यव्यापी धडक; २०० मीटर परिसरात विशेष मोहीम

Web Title: St employees da hike 58 percent pratap sarnaik house rent allowance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

ST workers protest : एसटी सेवा ठप्प होणार? प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीकडून बेमुदत आंदोलनाची घोषणा
1

ST workers protest : एसटी सेवा ठप्प होणार? प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीकडून बेमुदत आंदोलनाची घोषणा

वाहतूक कोंडीवरील तातडीच्या उपाययोजनांना प्राधान्य द्या; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे निर्देश
2

वाहतूक कोंडीवरील तातडीच्या उपाययोजनांना प्राधान्य द्या; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे निर्देश

Raigad News: शाळा प्रवेशावर संकट! जन्म दाखले न मिळाल्याने बालकांचे शिक्षण धोक्यात; जिल्हा परिषद आरोग्य विभागावर अनास्थेचा आरोप
3

Raigad News: शाळा प्रवेशावर संकट! जन्म दाखले न मिळाल्याने बालकांचे शिक्षण धोक्यात; जिल्हा परिषद आरोग्य विभागावर अनास्थेचा आरोप

खासदार श्रीकांत शिंदेंच्या मागणीची परिवहन मंत्री सरनाईकांकडून दखल, ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे निर्देश
4

खासदार श्रीकांत शिंदेंच्या मागणीची परिवहन मंत्री सरनाईकांकडून दखल, ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.