Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC : एसटीला राज्य सरकारचा शॉक, इलेक्ट्रिक बसच्या तोट्याची रक्कम देण्यास नकार घंटा, श्रीरंग बरगे यांचा आरोप

MSRTC News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय घेतला, मात्र या इलेक्ट्रिक बसेसमुळे महामंडळाच्या हा निर्णय अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 05, 2025 | 01:11 PM
एसटीला राज्य सरकारचा शॉक, इलेक्ट्रिक बसच्या तोट्याची रक्कम देण्यास नकार घंटा, श्रीरंग बरगे यांचा आरोप

एसटीला राज्य सरकारचा शॉक, इलेक्ट्रिक बसच्या तोट्याची रक्कम देण्यास नकार घंटा, श्रीरंग बरगे यांचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:

  • एसटी महामंडळाच्या ताफ्यात ६४१ इलेक्ट्रिक बसेस
  • तोट्याचा व्यवहार्यता पूरक निधी देण्यात क्लिष्ट निर्माण
  • सरकारने निधी देण्यास नकार घंटा वाजवली
मुंबई : दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर तसेच वाहनांमुळे प्रदूषण वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांकडे पर्याय म्हणून बघितले जाते. सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती जाहीर करत असते. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय महामंडळाच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या ताफ्यात आज पर्यंत ६४१ इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या असून बसेस येण्याच्या संख्येत अपेक्षित वाढ होत नसली तरी संथ गतीने का होईना,वाढ होत आहे . जस जशा बसेस दाखल होतील, त्या प्रमाणात तोटा सुद्धा वाढत चालला असून तोट्याचा व्यवहार्यता पूरक निधी देण्यात क्लिष्ट निर्माण झाला आहे . तांत्रिक कारण देत सरकारने निधी देण्यास नकार घंटा वाजवली असून एसटीला हा शॉक दिला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

वल्लभनगरमध्ये तरुणाचा जीव वाचवण्यासाठी अग्निशामक दलाची धाडसी मोहीम; मोठी दुर्घटना टळली

विजेवरील जास्तीत जास्त बस रस्त्यावर येऊन प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून इलेक्ट्रिक बसेस खरेदीवर सबसिडी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे यातून होणारा तोटा सुद्धा भरून देण्याचे सरकारचे धोरण असून याच धोरणाखाली एसटीने येणाऱ्या तोट्याची म्हणजेच व्यवहार्यता पूरक निधीची मागणी सरकारकडे केली आहे. तसेच होणाऱ्या तोट्याचा निधी अंदाजे तीन हजार कोटी रुपये सरकारने एसटीला अद्यापि दिला नसून आता त्यात नवीन क्लिष्ट निर्माण झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

तोट्याची रक्कम एसटीला देण्यात यावी असा ठराव राज्य परिवहन मंडळाच्या संचालक मंडळाच्या जुलै २३ मध्ये झालेल्या बैठकीत पारित करण्यात आला असून सदरची रक्कम सरकारने एसटीला देण्यात यावी अशी विनंती ठरावद्वारे करण्यात आली होती.मात्र सदर ठरावाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली नसून मंजुरी दिल्या शिवाय हा निधी देता येणार नाही असा तांत्रिक मुद्दा शासनाने उपस्थित केला असून त्यांमुळे हा निधी आता बुडेल का? अशी शंका निर्माण झाली आहे. तकलादू कारण देत सरकार आपल्याच धोरणाला हरताळ फासण्याचे काम करीत असून हे संयुक्तिक नाही असेही बरगे यांनी म्हटले आहे.

Ravindra Chavan News: कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर भर: रवींद्र चव्हाण

Web Title: St from the state government refusal to compensate for the loss of the electric bus allegations by shrirang barge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus
  • st mahamandal

संबंधित बातम्या

Guhagar News: एसटी ‘रातराणी’ची प्रकाशवाट अंधुक; प्रवासात हेडलाईटचा प्रकाश कंदिलासारखा
1

Guhagar News: एसटी ‘रातराणी’ची प्रकाशवाट अंधुक; प्रवासात हेडलाईटचा प्रकाश कंदिलासारखा

Pratap Sarnaik : सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट अन् आगार व्यवस्थापक निलंबित! नेमकं कारण काय?
2

Pratap Sarnaik : सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट अन् आगार व्यवस्थापक निलंबित! नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.