Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST News : ‘एसटी तेथे एसटी!’ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी लालपरीची खास धाव; 100 मिडी बसेस ताफ्यात दाखल होणार

ST News : डोंगर-दऱ्यांमधील आदिवासी पाडे आणि दुर्गम वाड्या-वस्त्यांपर्यंत आता लालपरी पोहोचणार आहे. विद्यार्थ्यांची 10 ते 15 किलोमीटरची पायपीट थांबवण्यासाठी 100 मिडी बसेस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 27, 2026 | 04:44 PM
ST Bus

ST Bus

Follow Us
Follow Us:
  • एसटीच्या ताफ्यात 100 ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ मिडी बसेस दाखल होणार
  • 28 आसनी बसेस अरुंद, डोंगराळ आणि अवघड मार्गांवर धावणार
  • नफा-तोट्यापेक्षा आदिवासी आणि विद्यार्थ्यांची सेवा महत्त्वाची : प्रताप सरनाईक
 

ST News : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, डोंगरदऱ्यांच्या कुशीत, नागमोडी वाटांवर आणि दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्यांच्या जीवनाशी अतूट नाते जोडलेली ‘लालपरी’ आता आणखी दूरवर पोहोचणार आहे. राज्यातील दुर्गम, डोंगराळ आणि अरुंद रस्त्यांवरील आदिवासी बांधव, ग्रामीण जनता तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवासाला नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात १०० ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ मिडी बसेस दाखल होणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

‘एसटी तेथे एसटी!’ हे केवळ घोषवाक्य नसून, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत सार्वजनिक वाहतुकीची जीवनवाहिनी पोहोचविण्याचा एसटीचा निर्धार आहे. ज्या वाडी-वस्तीतील आदिवासी बांधव आणि विद्यार्थी आजही शिक्षण, रोजगार, आरोग्य व दैनंदिन गरजांसाठी अनेक किलोमीटरची पायपीट करतात, त्यांच्या पावलांना आता लालपरीची साथ मिळणार आहे. दुर्गम भागातील पायवाटेवरून एसटीची वाट निर्माण करणे, हेच या निर्णयामागचे उद्दिष्ट आहे, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

पायपीट थांबविण्यासाठी लालपरीची नवी वाट!

मंत्री सरनाईक म्हणाले की, डोंगर-दऱ्या, तीव्र चढ-उतार, अरुंद रस्ते आणि नागमोडी वळणांमुळे अनेक ठिकाणी मोठ्या बसेस पोहोचणे शक्य होत नाही. परिणामी, या भागातील आदिवासी नागरिक आणि विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज १० ते १५ किलोमीटरपर्यंतची पायपीट करावी लागते. या पायपीटीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेत अडथळे निर्माण होऊ नयेत आणि दुर्गम भागातील नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी, यासाठी २८ आसनी मिडी बसेस दुर्गम मार्गांवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Drought : महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट? एल निनोच्या प्रभावावर फडणवीसांनी सांगितलं पुढचं चित्र

या मिडी बसेस अशा मार्गांवर धावणार आहेत, जिथे मोठ्या बसेसना पोहोचणे कठीण आहे. त्यामुळे रस्ता कितीही अरुंद असो, चढ कितीही तीव्र असो किंवा वळण कितीही अवघड असो—प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरीची चाके थांबणार नाहीत, असा निर्धार एसटीने केला आहे.

नफा-तोट्यापेक्षा सामाजिक बांधिलकी महत्त्वाची!

या मार्गांवरील बससेवा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नसली, तरी नफा-तोट्याच्या गणितापेक्षा आदिवासी बांधव आणि विद्यार्थ्यांची पायपीट थांबविणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी स्पष्ट भूमिका मंत्री सरनाईक यांनी मांडली.

ते म्हणाले, “सार्वजनिक वाहतूक ही केवळ नफा-तोट्याच्या ताळेबंदात मोजण्याची सेवा नाही; ती समाजाशी जोडलेली जबाबदारी आहे. एखाद्या विद्यार्थ्याला शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी दररोजची पायपीट वाचत असेल, एखाद्या आदिवासी कुटुंबाला बाजारपेठ, रुग्णालय किंवा शहराशी जोडणारा प्रवास सहज होत असेल, तर त्या सेवेचे मूल्य केवळ आर्थिक गणिताने ठरविता येणार नाही.”

‘गाव तिथे एसटी’पासून ‘वाडी-वस्ती तिथे एसटी’कडे!

“‘गाव तिथे एसटी’ ही एसटीची वर्षानुवर्षांची ओळख आहे. मात्र, स्वातंत्र्याला ८० वर्षे उलटूनही डोंगर-दऱ्यांच्या कुशीत असलेल्या अनेक आदिवासी पाड्यांपर्यंत एसटीची सेवा अद्याप पोहोचलेली नाही. या पाड्यांना मिडी बसेसच्या माध्यमातून जोडणे म्हणजे केवळ वाहतूक सुविधा देणे नव्हे, तर त्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम आहे,” असे प्रतिपादन सरनाईक यांनी केले.

“लालपरीची ही धाव केवळ किलोमीटर मोजणारी धाव नसून, माणसांमधील अंतर कमी करणारी धाव आहे. विद्यार्थ्यांच्या पावलांना शिक्षणाची दिशा देणारी, आदिवासी बांधवांच्या जीवनाला विकासाची जोड देणारी आणि दुर्गम महाराष्ट्राला मुख्य प्रवाहाशी जोडणारी ही सेवा आहे. ‘प्रवाशांची सेवा—हीच एसटीची प्राथमिकता’ हा मूलमंत्र प्रत्यक्षात आणत, महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत एसटी पोहोचविण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील,” असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठामपणे सांगितले.

‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’; अलका चौकात पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट, पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा भडका

Web Title: St news st buses 100 midi buses tribal students pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • pratap sarnaik
  • ST News

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : ‘दुष्काळ जाहीर केला, आता भरीव मदतीचा मुहूर्त कधी?’ हर्षवर्धन सपकाळांची सरकारकडे मोठी मागणी
1

Maharashtra Drought : ‘दुष्काळ जाहीर केला, आता भरीव मदतीचा मुहूर्त कधी?’ हर्षवर्धन सपकाळांची सरकारकडे मोठी मागणी

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?
2

शेतकऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी ग्वाही; ‘वाऱ्यावर सोडणार नाही’, नांदेडमध्ये नेमकं काय म्हणाल्या?

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
3

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.