Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उष्णतेच्या काहिलीत ‘नाथजल’ अनाथ; शुद्ध पाण्यासाठी प्रवाशांची वणवण, प्रकरण काय?

'नाथजल वे अर्धा लिटर पाणी ०९ रुपये आणि एक लिटर पाण्याची बाटली १५ रुपयांना मिळते. अन्य कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्यासाठी २० रुपये मोजावे लागतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 13, 2026 | 03:20 PM
उष्णतेच्या काहिलीत ‘नाथजल’ अनाथ; शुद्ध पाण्यासाठी प्रवाशांची वणवण, प्रकरण काय?
Follow Us
Follow Us:

एसटी स्थानकात महागडे पाणी
स्वस्त, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांची वणवण
राज्यातील बहुतांश बसस्थानकात अपुरा पुरवठा

दिनेश चव्हाण/गुहागर: राज्यात उष्णतेची लाट आलेली असतानाच एसटी प्रवाशांना स्वस्त आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशावेळी राज्य परिवहन (Msrtc) मंडळाच्या बहुसंख्य बस स्थानकांवरील स्वस्तात मिळणाऱ्या ‘नाथजल’चे अधिकृत स्टॉल बंद असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अन्य कंपन्यांच्या पाणी बाटली विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

एसटी महामंडळाच्या प्रवाशांना परवडणाऱ्या दरात पाणी मिळावे, यासाठी महामंडळाने नोव्हेंबर २०२० मध्ये ‘नाथजल’ सुरू केले. भारतीय रेल्वेच्या ‘रेलनीर’च्या धर्तीवर असलेल्या ‘नाथजला’साठी शेळके बेव्हरेजेसची नियुक्ती केली आहे. एसटी स्थानके-आगारात ‘नाथजला’ची विक्री करण्याचे धोरणात्मक आदेश आहेत. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून बहुसंख्य बसस्थानकांवरील नाथजलचे स्टॉल बंद असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे एसटी स्थानकात प्रवाशांनी पाण्याची मागणी केली असता, विक्रेत्यांकडून नाथजलऐवजी अन्य कंपन्यांचे बाटलीबंद पाणी प्रवाशांच्या हाती सोपवून २० रुपये वसूल करण्यात येतात.

Pratap Sarnaik: ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठीही परवाना बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

प्रवाशांचा घसा कोरडा

‘नाथजल वे अर्धा लिटर पाणी ०९ रुपये आणि एक लिटर पाण्याची बाटली १५ रुपयांना मिळते. अन्य कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्यासाठी २० रुपये मोजावे लागतात. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढत आहे. आधीच मोफत पाणपोईची बहुसंख्य बसस्थानकांमध्ये दुरवस्था झालेली असताना, ‘नाथजल’ देखील मिळत नसल्याने प्रवाशांच्या घशाला कोरड पडली आहे.

राज्यातील बहतांश बसस्थानकात अपूरा पुरवठा

एसटी महामंडळाच्या ताफ्यात वातानुकूलित बसगाड्यांची संख्या अपुरी आहे. बहुतांश प्रवासी साध्या बसगाड्यांतूनच प्रवास करतात. उन्हाच्या तहाख्यामुळे प्रवासात प्रचंड झळा बसत असल्याने तहान अधिक लागते. राज्यातील बहुसंख्य बसस्थानकात ‘नाथजला ‘चा प्रचंड तुटवडा आहे.

ऐन परीक्षेच्या काळात देवरूख ST प्रशासनाचा शिमगा? विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा…

नाथजल बाटलीबंद पाण्याचा एक बॉक्स १३५ रुपये तर अन्य कंपन्यांच्या पाण्याचा बॉक्स ८० ते १०० रुपये आहे. त्यामुळे स्टॉलधारकांना नाथजल पाणी परवडत नसल्याचे एका स्टॉलधारकाने खासगीत बोलताना सांगितले. अन्य कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्यातून थोडेफार आर्थिक फायदा होतो, असे त्यांने सांगितले.

Web Title: St passengers struggle for cheap and pure drinking water nathjal water bottle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • msrtc
  • Ratnagiri
  • st bus

संबंधित बातम्या

MSRTC News : लालपरीच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्यात वाढ जाहीर
1

MSRTC News : लालपरीच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्यात वाढ जाहीर

ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढ, महागाई भत्तासंदर्भात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
2

ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढ, महागाई भत्तासंदर्भात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Ratnagiri :रत्नागिरीत पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण
3

Ratnagiri :रत्नागिरीत पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण

Ratnagiri News : 19 मित्रांची ट्रिप अन् घात…! गणपतीपुळे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना;  पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची भीती
4

Ratnagiri News : 19 मित्रांची ट्रिप अन् घात…! गणपतीपुळे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.