कोंडये-संगमेश्वर बस गायब (फोटो- सोशल मीडिया)
ऐन परीक्षा काळात कोंडये-संगमेश्वर बस गायब
प्रवाशांना, पालकांना उडवाउडवीची उत्तरे
कोंडये गावचे सरपंच महेश देसाई आक्रमक
संगमेश्वर: बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या देवरुख आगार व्यवस्थापनाने सध्या प्रवाशांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा जणू शिमगा मांडला आहे. संगमेश्वर येथून कोहये येथे सकाळी नऊ वाजता जाणारी एसटी बस गेल्या आठ दिवसांपासून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बंद करून प्रशासनाने आपला खरा चेहरा दाखवून दिला आहे.
सध्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असून कोंडये, डावखोल यांसारख्या ६ ते ७ गावांतील परीक्षार्थी विद्याध्यर्थ्यांचे या बस अभावी प्रचंड हाल होत आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीची जाणीव असूनही देवरुख आगाराचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत असून, त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी क्रूर थट्टा चालवल्याचा संतापजनक आरोप आता ग्रामस्थांमधून होत आहे. एकीकडे शासन शिक्षण हक्क आणि मुलींना मोफत प्रवास अशा योजनांच्या जाहिराती करत असताना, दुसरीकडे देवरुख आगार व्यवस्थापन मात्र प्रत्यक्ष मैदानात विद्याथ्यांची वाट अडवून असले आहे.
‘लालपरी’ची चाके थांबणार? सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम; ST ‘बंद’चा दिला इशारा
एसटी प्रशासनाकडून जनतेव्या भावनांशी असा खेळ यखेळला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. व्यवस्थापन कडून जाणीवपूर्वक सेवा विस्कळीत केली असल्याचा आरोप सतप्त प्रवाशांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा खेळ खेळायाचा अधिकार या अधिकाऱ्याना कोणी दिला? असा रोकटोक सवाल आता विचारला जात असून, वरिष्ठांनी या मुझेर अधिका-यांच्या कानपिचक्या घेण्याची मागणी जोर धरत आहे, या सर्व प्रकरणावर आता राजकीय वातावरणही तापले असून, कीडये गावचे सरपंच तथा शिवसेना (शिंदे पक्ष) कसबा विभाग प्रमुख महेश देसाई यानी अछामक पवित्रा घेतला आहे.
MSRTC News: नागरिकांचा प्रवास सुखकर होणार; ‘इतक्या’ बसेस सेवेत दाखल होणार
कोंडये परिसरातील विद्याध्यर्थ्यांना आपली परीक्षा केंद्रे गाठण्यासाठी ही नऊ वाजताची बस एकमेव आधार होती. ही बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांना आता पहाटे सहा वाजताच घर सोडावे लागत आहे. जो वेळ विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी उजळणीसाठी द्यायला हवा, तो वेळ बसच्या प्रतीक्षेत आणि पायपीट करण्यात वाया जात आहे. या संदर्भात देवरुख आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून विचारणा केली असता, त्यांच्याकडून प्रवाशांना आणि पालकांना अत्यंत उद्धट आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. अधिकाऱ्यांच्या या मुजोर वागणुकीमुळेच एसटी सेवेचा हा खेळखंडोबा झाला असल्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.






