Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! लवकरच निवडणुकांची घोषणा? तीन टप्प्यात निवडणुका, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, तर महापालिका निवडणुका…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी आता अंतिम टप्प्यात असून राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 01, 2025 | 06:43 PM
मोठी बातमी ! येत्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा? तीन टप्प्यात निवडणुका, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, तर अखेरच्या टप्प्यात महापालिका निवडणुका

मोठी बातमी ! येत्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा? तीन टप्प्यात निवडणुका, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, तर अखेरच्या टप्प्यात महापालिका निवडणुका

Follow Us
Close
Follow Us:
  • येत्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होणार
  • पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका
  • दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती
महापालिका निवडणुकासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. येत्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  ही निवडणूक तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात नगरपालिका तर अंतिम टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे.

दरम्यान प्रभाग रचना, इतर मागासवर्गांचे आरक्षण यांसारख्या विविध मुद्द्यांवरून गेली अनेक वर्षे रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तसेच महापालिकांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती आदींच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून देण्यात आली. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल.

Sharad Pawar at Satyacha Morcha: लोकशाही वाचवायची असेल तर..; मुंबईतील सत्याच्या मोर्चातून शरद पवारांचा एल्गार

मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ ते २० जानेवारी २०२६च्या आत घेण्याचा घेण्याचा आयोगाचा प्रयत्न राहणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदतकार्यात गुंतलेली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ची मुदत दिली आहे. निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी १० दिवस आधी पार पाडल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात प्रथमच मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (ईव्हीएम) तुटवडा भासू नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मशिन पुरवठ्यासाठी मध्य प्रदेश सरकारशी करार केला आहे. याशिवाय ‘इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडून ५० हजार ईव्हीएम खरेदी केली आहेत. तसेच भारत निवडणूक आयोगाकडेही ‘ईव्हीएम’ची मागणी करण्यात आल्याचे समजते. तिन्ही टप्प्यांत पार पडणाऱ्या या निवडणुकांतील मतांची मोजणी एकत्रित होणे शक्य नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रत्येक टप्प्यातील निवडणुकांची मतमोजणी दुसऱ्या दिवशी होईल. निवडणूक यंत्रणेवरील ताण आणि मर्यादित मनुष्यबळ लक्षात घेता प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर मतमोजणी होईल, असेही खात्रीलायकरित्या समजते.

मविआ-मनसेच्या सत्याच्या मोर्चाने काय साधेल? मतचोरी विरोधातील वादळ मुंबईत धडकणार

Web Title: State election commission will announce the municipal and nagar panchayat elections next week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • BMC
  • Election
  • Mumbai
  • nagar panchayat elections

संबंधित बातम्या

Satara Municipal Election Results 2025: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रणनीती यशस्वी ,सात नगरपालिका भाजपच्या गोटात
1

Satara Municipal Election Results 2025: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रणनीती यशस्वी ,सात नगरपालिका भाजपच्या गोटात

Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025: विरोधकांचे नॅरेटिव्ह फसले; नगरपरिषद निवडणुकांत भाजप–महायुतीचे घवघवीत यश
2

Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025: विरोधकांचे नॅरेटिव्ह फसले; नगरपरिषद निवडणुकांत भाजप–महायुतीचे घवघवीत यश

सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता…! भाजपवर किशोरी पेडणेकरांचा संताप, पैशांचे वाटप केल्याचा आरोप
3

सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता…! भाजपवर किशोरी पेडणेकरांचा संताप, पैशांचे वाटप केल्याचा आरोप

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Update: कोकणात नितेश राणे विरूद्ध निलेश राणे- दीपक केसरकरांची प्रतिष्ठा पणाला
4

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Update: कोकणात नितेश राणे विरूद्ध निलेश राणे- दीपक केसरकरांची प्रतिष्ठा पणाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.