मुंबई – कोरोना महामारीमुळं जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे. त्यामुळं कोरोना संकटानंतर आता संपूर्ण जग पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, राज्यातील उत्पन्न वाढीतील आलेख वाढता असल्याची माहिती सरकारच्या वित्त विभागानी दिली आहे. दरम्यान, आगामी बारा वर्षात खर्च नियंत्रणात राहिला तर अर्थसंकल्पातील अंदाजित २५ कोटीच्यावर महसुली तूट कमी होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.
[read_also content=”१५ लाख दिव्यांनी उजळला शरयू घाट, रामाच्या दर्शनानंतर मोदींच्या सहभाग https://www.navarashtra.com/india/fifteen-lakh-lamps-in-diwali-at-sharyu-ghat-ayodhya-338784.html”]
दरम्यान, राज्य सरकारने जीएसटी थकबाकीदार व्यापाऱ्यांसाठी राबवलेली अभय योजना, कोरोनाकाळात आर्थिक स्थिती, घेतलेले निर्णय आदीमुळं वस्तू आणि सेवा कराच्या उत्पन्नात अंदाजापेक्षा अधिक वाढ झाली आहे. वित्त विभागाने ऑगस्ट 2022 पर्यँत जीएसटीचे उत्पन्न 72 हजार 145 कोटी रुपये अंदाजित केले होते. मात्र, प्रत्यक्षात जीएसटीतून 72 हजार 881 कोटी रुपये जमा झाले. त्यामुळं राज्यात अर्थव्यवस्थेला आता उभारी मिळाली आहे.