Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वीज चोरी करणे पडले महागात; न्यायालयाने केला ५ लाख ८८ हजारांचा दंड

इस्लामपूर येथील जिजामाता पेपर मिल्स कंपनीच्या वीज मीटर मध्ये फेरफार करून सुमारे ६ लाख ३८ हजार ३२४ रूपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी कंपनीचे मालक श्रीकांत ज्ञानदेव पाटील (रा. इस्लामपूर) यांना न्यायालयाने ५ लाख ८८ हजार ७७४ रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 22, 2023 | 08:50 AM
वीज चोरी करणे पडले महागात; न्यायालयाने केला ५ लाख ८८ हजारांचा दंड
Follow Us
Follow Us:

इस्लामपूर : इस्लामपूर येथील जिजामाता पेपर मिल्स कंपनीच्या वीज मीटर मध्ये फेरफार करून सुमारे ६ लाख ३८ हजार ३२४ रूपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी कंपनीचे मालक श्रीकांत ज्ञानदेव पाटील (रा. इस्लामपूर) यांना न्यायालयाने ५ लाख ८८ हजार ७७४ रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश क्र. १ अचला एच. काशीकर यांनी ही शिक्षा सुनावली.

श्रीकांत ज्ञानदेव पाटील यांच्या मालकीच्या जिजामाता पेपर मिल्स कंपनीतील मीटरमध्ये फेरफार करून ३७९५९ केव्ही इतक्या युनिटची सुमारे ६ लाख ३८ हजार ३२४ रूपयांची वीज चोरी केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची जिल्हा न्यायाधीश क्र. १ अचला एच. काशीकर यांच्यासमोर गुणदोषावर सुनावणी झाली.

सरकार पक्षातर्फे सरकारी वकील राजेश एन. मडके यांनी काम पाहिले. या केसमध्ये ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये फिर्यादी कार्यकारी अभियंता संतोष कारंडे, उपकार्यकरी अभियंता अनिल मोहिते, राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय माळी, तपासी अंमलदार सचिन स्वामी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. त्यानुसार न्यायालयाने श्रीकांत पाटील यास दोषी धरून ५ लाख ८८ हजार ७७४ रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. व दंड न भरल्यावर १० महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली.

फायद्याच्या ३ पट ठाेठावला दंड

श्रीकांत पाटील याने त्याच्या मीटरची गती ३० टक्के पर्यंत कमी केली होती. व त्यातून लाईटच्या बिलामध्ये ३० टक्के पर्यंत बचत केली. त्यामुळे आरोपीने साधलेल्या फायद्याच्या ३ पट दंड न्यायालयाने ठोठावला.

Web Title: Stealing electricity is costly the court fined 5 lakh 88 thousand nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2023 | 08:50 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Islampur
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील
1

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील

Khopoli : खोपोली नगरपरिषदेत १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेविकेच्या दाव्याने खळबळ
2

Khopoli : खोपोली नगरपरिषदेत १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेविकेच्या दाव्याने खळबळ

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब
3

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी
4

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.