Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मागण्या पुर्ण होईपर्यंत आंदोलनावर ठाम! शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु

मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना व पाणी संघर्ष समिती यांच्यावतीने पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांंना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळावी. कर्जाची वसूली थांबवावी. ई पीक नोंद पुर्वी प्रमाणे तलाठ्याने करावी या व अन्य मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले असून मागण्या पुर्ण झाल्याशिवाय उठणार नसल्याच्या मुद्यावर आंदोलक ठाम असल्याचे सांगण्यात आले.

  • By Aparna
Updated On: Sep 05, 2023 | 07:56 PM
मागण्या पुर्ण होईपर्यंत आंदोलनावर ठाम! शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु
Follow Us
Follow Us:

मंगळवेढा:  मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना व पाणी संघर्ष समिती यांच्यावतीने पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांंना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळावी. कर्जाची वसूली थांबवावी. ई पीक नोंद पुर्वी प्रमाणे तलाठ्याने करावी या व अन्य मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले असून मागण्या पुर्ण झाल्याशिवाय उठणार नसल्याच्या मुद्यावर आंदोलक ठाम असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवेढा तालुक्यात यंदा जून पासून पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्याने खरीप हंगाम धोक्यात सापडला असून पावसाअभावी पेरलेली पिके करपून जात असल्याचे चित्र आहे. या पिकासाठी १ रुपया पीक विमा ६८ हजार शेतकऱ्यांंनी भरला असून दुष्काळी परिस्थितीमुळे २५ टक्के अग्रीम रक्कम त्यांना शासनाने देवून दिलासा द्यावा. तसेच शेतकर्‍याकडील सर्व कर्जाची वसूली थांबविण्यात यावी. खरीप पिकाच्या कर्जाचे पुनर्गठन करुन रब्बी हंगामासाठी नव्याने पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे. म्हैसाळ योजनेचे पाणी लाभ क्षेत्रातीळ गावांना तात्काळ मिळावे.

–तालुक्यात चाऱ्याची भिषण टंचाई
तसेच मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध करुन द्यावा,उजनी उजव्या कालव्याचे पाणी तालुक्यातील लाभ क्षेत्राला मिळावे त्याच बरोबर हे पाणी माण नदीत सोडून नदीकाठावरील शेतीला दिलासा द्यावा. पावसाअभावी तालुक्यात चाऱ्याची भिषण टंचाई निर्माण झाली असून चारा डेपो सुरु करुन शेतकऱ्यांचे पशुधन वाचवावे. १५ जून पासून बंद असलेले पी एम किसान योजनेचे काम तात्काळ सुरु करावी तसेच शेतकऱ्यांंना चूक दुरुस्तीसाठी एक खिडकी योजना चालू करावी. दूधाला विनाकपात ३४ रुपये पेक्षा कमी दर देणार्‍या संस्थेवर कायदेशीर कारवाई करावी. शेतकरी वर्ग हा अज्ञान असल्यामुळे त्यांना मोबाईल मधील पुरेसे ज्ञान नाही. परिणामी मोबाईलवर ई पीक पाहणी नोंद करताना अनेक अडचणींना सामना करावा लागता असल्यामुळे बरेसचसे ग्रामीण शेतकरी या पीक नोंदीपासून वंचित रहात असल्यामुळे त्यांना शासनाचा लाभ मिळणे दुरापास्त बनत आहे.

– मनरेगातून कामे उपलब्ध करुन द्यावे
दरम्यान पुर्वी प्रमाणे गावकामगार तलाठ्यांनी शेताच्या बांधावर जावून पिकाच्या नोंदी करुन घ्याव्यात. सर्व प्रकारच्या पशु खाद्याचे दर नियंत्रीत करावेत. लम्पी आजाराने मेलेल्या जनावरांचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे, दुष्काळाची छाया गडद होत असल्याने मजूरांच्या हाताला कामे नसल्याने मनरेगातून कामे उपलब्ध करुन द्यावे, अशा विविध मागण्यासाठी हे धरणे आंदोलन (दि.४) पासून सुरु आहे.

हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल घुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवराज घुले, श्रीमंत केदार, आबा खांडेकर, हरी खांडेकर, श्रीशैल्य हत्ताळी, बाळासो खताळ, भोजलींग जानकर, विराज कदम,नागेश बिराजदार, दत्तात्रय म्हेत्रे, संभाजी मलमे, बंडू थोरबोले,संजय चौगुले,रावसाहेब संपांगे, हरी जानकर आदी या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झालेले आहेत.

सध्या पाऊस नसल्यामुळे तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया असताना वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांना कृषी पंपाची प्रिंट वीज बिले भरण्याचा तसेच मोबाईलवरुन कायदा कलम टाकून कारवाईचा मेसेज पाठवून ऐन दुष्काळात जखमेवर मिठ चोळण्याचे काम केल्याने वीज वितरण कंपनीच्या कारभाराचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.

Web Title: Stick to the movement until the demands are met indefinite dharna movement started for various demands of farmers nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2023 | 07:56 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mangalwedha
  • Solapur News

संबंधित बातम्या

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी
1

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
2

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
3

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
4

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.