Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेकायदेशीर खैर झाडांवर आधी कारवाई मग चोरांनी केला हात साफ; रिपब्लिकन पक्षाकडून कारवाईची मागणी

साताऱ्यामध्ये धक्कादायक चोरीचा प्रकार समोर आला आहे. आसनीतील वन विभागाने जप्त केलेला खैराचा साठा चक्क चोरीला गेला आहे. यामुळे वादाला तोंड फुटले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 29, 2025 | 10:53 AM
Stock of Khair trees seized by the forest department in Asani stolen Satara Crime News

Stock of Khair trees seized by the forest department in Asani stolen Satara Crime News

Follow Us
Close
Follow Us:

Satara Crime News : मेढा : जावळी तालुक्यातील आसनी येथे मार्च महिन्यात भोगवटा वर्ग एक असलेल्या क्षेत्रात बेकायदेशीररित्या खैर झाडांची वृक्षतोड झाली होती. या वृक्षतोडीवर वनपरिक्षेत्र अधिकारी जावली यांनी कारवाई करीत तब्बल आठ ते नऊ टन खैर पंचनामा करीत जप्त केला होता. मात्र हाच जप्त केलेला खैर वनविभागाच्या (Forest Department) कस्टडीतून चक्क चोरीला गेला असून, संबंधितावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी केली आहे.

किरण बगाडे यांनी उपवसंरक्षक अमोल सातपुते यांना याबाबत निवेदन सादर केले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की आसनी येथील शिवारात भोगवटा वर्ग दोन जमीन प्रकारांमध्ये कोणत्याही प्रकारच्या वृक्षतोडीची परवानगी दिली जात नसताना देखील वनपाल एस डी चौगुले यांच्या वरदहस्ताने भोगवटादार वर्ग दोन जमिनींमध्ये मार्च महिन्यात वृक्षतोड करण्यात आली होती. त्यावेळी ही बाब वनविभागाच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सदर ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी व पंचनामा करीत येथील खैर जप्त करण्यात आला होता.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वन विभागाकडून जप्त करण्यात आलेला सदर खैर जातीचे लाकूड शेतकऱ्याच्या शेतामध्ये अप्रत्यक्षरित्या शासनाच्या कस्टडीमध्ये होते. तरीदेखील येथील जवळपास आठ ते नऊ टन खैर लाकूड चोरीला गेले आहे. ही बाब गंभीर असून या घटनेची वनविभागाने तात्काळ दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून या घटनेस जबाबदार असणाऱ्या वन कर्मचारी चौगुले, वनपाल माने व सदर कालावधीतील प्रभारी असलेले वनपरिक्षेत्रअधिकारी यांच्यावर देखील कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी. अशी मागणी बगाडे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी इशारा दिला आहे.

शासनाच्या नाकावर टिच्चून’ हम खडा तो सरकार से बडा’ अशी चुणूक शेतकरी व संबंधित खैरवृक्ष तोड करणारा व्यापारी यांनी प्रशासनाला दाखवून दिली असून हा माल शेतकरी आणि व्यापारी यांच्या संगनमताने चोरीला गेला असल्याची चर्चा केळघर परिसरात सुरू आहे.असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे वन विभागाने या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ दोषींवर कारवाई करावी.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कवठे एकंदला दारू कामात स्फोट

तासगाव तालुक्यातील कवठे एकंद गावात रविवारी दुपारी शोभेचे दारूकाम करताना झालेल्या स्फोटाने गाव दणाणून गेले. सुतार गल्ली परिसरातील या घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यापैकी १६ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे गावभर भीती व धाकधूक पसरली असून दसर्‍यापूर्वीच या अपघाताने गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सुतार गल्ली येथील सार्वजनिक मंडळाकडून दसर्‍याच्या तयारीसाठी पारंपरिक शोभेचे दारूकाम बनवण्याचे काम सुरू होते. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक दारू कामाचा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दूरवर पोहोचला आणि क्षणातच परिसर धुराने गुदमरून गेला. गावकऱ्यांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले.

Web Title: Stock of khair trees seized by the forest department in asani stolen satara crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • crime news
  • Forest Department
  • Satara Crime

संबंधित बातम्या

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! न्यायालयाने आरोपींना दिला मोठा दणका
1

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! न्यायालयाने आरोपींना दिला मोठा दणका

गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा नवा प्रयोग; ‘या’ टोळ्याकडून काळ्या पैशाचा हिशेब घेतला जाणार
2

गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा नवा प्रयोग; ‘या’ टोळ्याकडून काळ्या पैशाचा हिशेब घेतला जाणार

अर्जेंटिना हादरलं! नखे उपटली, बोटं छाटली आणि शेवटी गळा दाबून हत्या, लाईव्ह स्ट्रीमिंग करत दाखवलं थरारक प्रकार
3

अर्जेंटिना हादरलं! नखे उपटली, बोटं छाटली आणि शेवटी गळा दाबून हत्या, लाईव्ह स्ट्रीमिंग करत दाखवलं थरारक प्रकार

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…
4

कौटुंबिक वादातून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; डोकं भिंतीवर आपटले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.