Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत बालमृत्यूचे प्रमाण कमी मात्र….; सरासरी ‘इतक्या’ मृत्यूंची होतेय नोंद

सरकारी आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये दररोज सरासरी ४५ बालमृत्यू होत होते. विविध सरकारी योजनांमुळे या संख्येत घट झाली असली, तरी परिस्थिती अजूनही चिंताजनक असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 20, 2026 | 07:38 PM
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत बालमृत्यूचे प्रमाण कमी मात्र....; सरासरी 'इतक्या' मृत्यूंची होतेय नोंद

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत बालमृत्यूचे प्रमाण कमी मात्र....; सरासरी 'इतक्या' मृत्यूंची होतेय नोंद

Follow Us
Close
Follow Us:

पाच वर्षांत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश
या वर्षात राज्यात १२ हजार ७९२ बालमृत्यूंची नोंद
२०२१-२२ मध्ये ही संख्या १६ हजार ७४८ इतकी

सुनयना सोनवणे / पुणे: महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत (Health News) बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले असले, तरी राज्यात अजूनही पाच वर्षांखालील मुलांचे दररोज सरासरी ३५ मृत्यू होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ या वर्षात राज्यात १२ हजार ७९२ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. २०२१-२२ मध्ये ही संख्या १६ हजार ७४८ इतकी होती.

अकाली जन्म, जन्मावेळी कमी वजन, बर्थ ॲस्फिक्सिया, श्वसन ताण सिंड्रोम, न्यूमोनिया, सेप्सिस, जन्मजात विकृती आणि ‘सडन इन्फंट डेथ सिंड्रोम’ ही बालमृत्यूमागील प्रमुख कारणे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. या समस्यांवर लक्ष केंद्रीत करून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले असले, तरी ते शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. प्रतिबंध करता येणाऱ्या किंवा उपचाराने बऱ्या होणाऱ्या आजारांमुळे एकाही बालकाचा मृत्यू होऊ नये, यासाठी विविध स्क्रीनिंग कार्यक्रम आणि गावपातळीवरील जनजागृती मोहिमा राबविल्या जात आहेत.

Child Mortality : महाराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण घटले तरीही दररोज 35 बालकांचा होतोय मृत्यू

तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेपूर्व नियोजन आणि प्रसूतिपूर्व काळजी याला विशेष महत्त्व आहे. “महिलेच्या कुटुंबासह संपूर्ण आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी आहे की गर्भधारणेपूर्वीपासून योग्य काळजी घेतली जावी. गर्भधारणेच्या सुरुवातीपासून योग्य वैद्यकीय सेवा मिळाल्यास अकाली प्रसूतीसारख्या गुंतागुंती टाळता येतात,” असे तज्ज्ञांनी सांगितले.

सरकारी आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये दररोज सरासरी ४५ बालमृत्यू होत होते. विविध सरकारी योजनांमुळे या संख्येत घट झाली असली, तरी परिस्थिती अजूनही चिंताजनक असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. सार्वजनिक व ग्रामीण आरोग्य सुविधांमधील लवकर हस्तक्षेप, डॉक्टर व एएनएमना दिलेले प्रशिक्षण आणि लसीकरण मोहिमा यामुळे बालमृत्यू कमी होण्यास मदत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, नवजात बालकांच्या पुनर्जीवन प्रक्रियेबाबत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अधिक प्रशिक्षण देण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

‘पाच वर्षांखालील बालमृत्यू कमी करण्यासाठी साध्या पण जीव वाचवणाऱ्या उपाययोजनांवर भर देणे गरजेचे आहे. केवळ स्तनपान, योग्य वेळी पूरक आहार, संपूर्ण लसीकरण हे बालकांच्या आरोग्याचा पाया आहे.’
— डॉ. चैतन्य सोमवंशी, नवजात तज्ज्ञ

महाराष्ट्रातील गेल्या पाच वर्षांतील बालमृत्यू (० ते ५ वर्षे)
२०२५-२६ — १२,७९२
२०२४-२५ — १३,७२८
२०२३-२४ — १३,८१०
२०२२-२३ — १७,१५०
२०२१-२२ — १६,७४८
(स्रोत : महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग)

पाच वर्षात २ हजार १६१ बाल मृत्यू ; स्मार्ट सिटीत धक्कादायक आकडा

बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारचे उपक्रम –
– विशेष नवजात शिशू काळजी कक्ष स्थापन करणे
– अंगणवाड्यांमार्फत मोफत पौष्टिक आहार उपलब्ध करून देणे
– विशेष प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतरची आरोग्यसेवा
– माता आणि नवजात बालमृत्यू कमी करण्यासाठी ‘लक्ष्य’ उपक्रमाची अंमलबजावणी
– लसीकरणासाठी ‘मिशन इंद्रधनुष्य’ मोहीम
– आजारांचे लवकर निदान करण्यासाठी ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ राबविणे

Web Title: Success in reducing child mortality rate in maharashtra over last five years health news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • Health News
  • Maharashtra Govenment

संबंधित बातम्या

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार
1

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

Mumbai Hospital News: ओपन हार्ट सर्जरीला पर्याय! HVS हॉस्पिटल्सची प्रगत क्लिप थेरपी ठरतेय वरदान
2

Mumbai Hospital News: ओपन हार्ट सर्जरीला पर्याय! HVS हॉस्पिटल्सची प्रगत क्लिप थेरपी ठरतेय वरदान

Ola-Uber Ban : महाराष्ट्र सरकारने केली ओला, उबर आणि रॅपिडोवर मोठी कारवाई; आता हे ॲप्स फोनमधून होऊ शकतात गायब
3

Ola-Uber Ban : महाराष्ट्र सरकारने केली ओला, उबर आणि रॅपिडोवर मोठी कारवाई; आता हे ॲप्स फोनमधून होऊ शकतात गायब

पुण्यात Dengue चा डंख! वर्षभरात तब्बल ‘इतके’ संशयित रुग्ण; महापालिका हायअलर्टवर…
4

पुण्यात Dengue चा डंख! वर्षभरात तब्बल ‘इतके’ संशयित रुग्ण; महापालिका हायअलर्टवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.