Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Factory Strike : महाराष्ट्रातील साखर कारखाने उद्यापासून बंद? राजू शेट्टी आक्रमक, ऊसाचे ट्रॅक्टर-ट्रक अडवणार

Sugar Factory Strike : ऊसतोड मजूर आणि साखर कामगारांच्या आंदोलनाची दिशा बदलली आहे. राजू शेट्टी यांनी उद्यापासून साखर कारखाने बंद पाडण्याचा आणि ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा दिला आहे. रेठरे येथील कृष्णा साखर कारखान्यावर सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 14, 2026 | 07:54 PM
Raju shetti

Raju shetti

Follow Us
Follow Us:
  • राजू शेट्टींची आंदोलनाची दिशा बदलण्याची घोषणा
  • ऊसाचे ट्रॅक्टर आणि ट्रक अडवण्याचा इशारा
  • मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका
 

ऊस तोड मजूर आणि साखर कामगारांचा प्रश्न सध्या ज्वलंत झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. या आंदोलनाची दिशा आता बदलली असून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मोठे पाऊल उचलले आहे. उद्यापासून राज्यातील साखर कारखाने बंद पडण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला असून आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. (Sugar Factory Strike)

याशिवाय, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक अडवण्यासह साखर कारखान्यांतून साखर बाहेर जाऊ देणार नसल्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे. त्यामुळे आता कामगारांच्या मागण्यांवर तोडगा कधी निघणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राजू शेट्टींची आंदोलनाची दिशा बदलण्याची घोषणा

यापूर्वी २२ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता आंदोलनाची दिशा बदलण्यात आली आहे. उद्यापासूनच ऊस वाहतूक रोखून साखर कारखान्यांचे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी

कामगारांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. साखर कारखान्यांवर दबाव आणण्यासाठी वाहतूक आणि साखर बाहेर पाठवण्याच्या प्रक्रियेला विरोध केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रेठरे येथील कृष्णा कारखान्यावर आंदोलन

रेठरे येथील कृष्णा साखर कारखान्यावर उद्या सकाळी १० वाजता जाऊन कारखाना बंद पाडण्याची घोषणा अभिजीत दिपके यांनी केली आहे. उद्याच तीन साखर कारखाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सध्या महामार्ग आणि रास्ता रोको आंदोलन थांबवण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्याऐवजी थेट साखर कारखाने आणि ऊस वाहतुकीला लक्ष्य करून आंदोलन पुढे नेण्याची रणनीती आखण्यात आल्याचे दिसत आहे.

ऊस गाळप हंगामावर अनिश्चिततेचे सावट

तात्यासाहेब काळे यांनीही या आंदोलनाबाबत कठोर भूमिका मांडली आहे. मागण्या पूर्णपणे मान्य होत नाहीत, तोपर्यंत २२ ऑक्टोबरपासून राज्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

एकीकडे ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत, तर दुसरीकडे साखर कामगार आणि ऊसतोड मजुरांचे आंदोलन तीव्र होत आहे. या दोन्ही आंदोलनांचा परिणाम साखर उद्योगावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम वेळेत सुरू होणार का, कारखान्यांचे कामकाज विस्कळीत होणार का आणि कामगारांच्या मागण्यांवर तोडगा कधी निघणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण

Web Title: Sugar factory strike maharashtra raju shetty sugar workers protest vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • Raju Shetti
  • Sugar Factory
  • Sugarcane Farmers

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
1

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.