Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ऊस बिलासाठी रणांगण!’ सोलापुरात शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन तीव्र; प्रशासनाची विनंती धुडकावली

दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे जवळपास १३० कोटी रुपयांचे ऊस बिल थकविल्याने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

  • By विवेक
Updated On: May 28, 2026 | 09:46 PM
Sugarcane Farmer Protest in Solapur, Sugarcane Farmer, Farmer Protest, Solapur, Solapur news,

Sugarcane Farmer Protest in Solapur, Sugarcane Farmer, Farmer Protest, Solapur, Solapur news,

Follow Us
Follow Us:

सोलापूर शहर प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे जवळपास १३० कोटी रुपयांचे ऊस बिल थकविल्याने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आपल्या हक्काच्या पैशासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही तीव्रतेने सुरूच होते.

“शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उसाची संपूर्ण थकीत रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत एकही शेतकरी मागे हटणार नाही,” असा आक्रमक इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. आंदोलनस्थळी दिवसभर घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, गुरुवार दि. २८ रोजी दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी जवळपास तासभर चर्चा केली. वाढते ऊन आणि आंदोलनातील त्रास लक्षात घेता वयोवृद्ध महिला व पुरुष शेतकऱ्यांना घरी पाठवण्याची विनंती त्यांनी आंदोलकांना केली. मात्र, संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाची ही विनंती एकमुखाने फेटाळून लावत, “मागण्या मान्य होईपर्यंत वयोवृद्धांसह आंदोलन सुरूच ठेवणार,” असा निर्धार व्यक्त केला.

या आंदोलनात अमोल पाटील यांच्यासह अरविंद घोडके, अंबादास शिवशंकर, सचिन जवळगे, प्रशांत सुरवसे, गणेश नरे, सचिन सपकाळ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.

बारामतीत पोलिसांचा मोठा प्रहार! जिममधील तरुणांना विकले जाणारे ‘टर्मिन’ इंजेक्शन जप्त; ८३ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक

विविध संघटना व पक्षांचा वाढता पाठिंबा

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला विविध पक्ष व संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. दि. २७ रोजी संभाजी आरमार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तर दि. २८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मूलभूत हक्क संघर्ष समिती आणि अखिल भारतीय किसान सभा, सोलापूर यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा जाहीर केला. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही तोंडी पाठिंबा दिल्याची माहिती आंदोलक शेतकऱ्यांनी दिली.

“पेट्रोल, डिझेलची महागाई व टंचाई हे मोदी सरकारचे पाप,” हर्षवर्धन सकपाळ यांचा पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Web Title: Sugarcane farmer protest in solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • Farmer Protest
  • Solapur
  • Sugarcane Farmers

संबंधित बातम्या

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल
1

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल

पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती
2

पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.