Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunetra Pawar Oath Taking: सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यपदाची इतकी घाई कशासाठी? पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Sunetra Pawar Oath Taking: आताच्या घडामोडींनुसार सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या कोअर टीमने अत्यंत घाईने घेतल्याचे समजते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 31, 2026 | 10:27 AM
Sunetra Pawar Oath Taking: सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यपदाची इतकी घाई कशासाठी? पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Follow Us
Close
Follow Us:
  • सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार
  • या सोहळ्यापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवण्यात आले
  • कोअर टीम आणि स्वतः सुनेत्रा पवार यांच्या संमतीनेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शपथविधी लवकरात लवकर उरकून घेण्याची भूमिका पक्षाने मांडली
Sunetra Pawar Oath Taking:   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत.  सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या निर्णयामुळे  पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.  अजित पवार यांच्या निधनाला चार दिवस उलटत नाहीत तोच सुनेत्रा पवार आज (31 जानेवारी) सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्याचवेळी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत इतकी घाई का करण्यात आली असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, मात्र या सोहळ्यापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवण्यात आले आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीने लढवल्या होत्या. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.

Sharad Pawar PC News: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत माहिती नाही…; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

परंतु, आताच्या घडामोडींनुसार सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या कोअर टीमने अत्यंत घाईने घेतल्याचे समजते. दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाच्या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी या प्रक्रियेला वेग दिला असून, सुनेत्रा पवार यांच्या संमतीनेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा शपथविधी सोहळा तातडीने पार पडत आहे.

सुनेत्रा पवार यांची तातडीने गटनेतेपदी आणि उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर टीमनेच घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा काही लोक जाणीवपूर्वक पसरवत असल्याने, त्या शक्यतांना पूर्णविराम देण्यासाठीच सुनेत्रा पवार यांच्या निवडीच्या हालचाली इतक्या वेगाने करण्यात आल्याचे समजते. कोअर टीम आणि स्वतः सुनेत्रा पवार यांच्या संमतीनेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शपथविधी लवकरात लवकर उरकून घेण्याची भूमिका पक्षाने मांडली आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या नेत्यांनीच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याबाबत आग्रही भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra Politics: पुण्यात सत्तेसाठी भाजपचा मोठा डाव; 

दरम्यान, काल बारामतीमध्ये अजित पवारांच्या रक्षा विसर्जनाचा विधी पार पडला. या प्रसंगी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र होत्या. मात्र, विधी संपल्यानंतर दोघीही वेगवेगळ्या दिशेने रवाना झाल्या. त्यानंतर मुंबईतील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आणि उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय झाल्यानंतरही सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली नाही किंवा त्यांच्याशी संवाद साधलेला नाही, असेही सांगितले जात आहे. अजित पवारांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील आणि पक्षाचे विलीनीकरण होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आताच्या घडामोडी पाहता या चर्चेला मोठा खोडा बसला असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Sunetra pawars oath taking why the rush for sunetra pawars deputy chief minister post what exactly happened behind the scenes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Baramati Politics
  • Sunetra ajit Pawar

संबंधित बातम्या

Sanjay Raut PC:  सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेची घाई का?  संजय राऊतांचा खळबळजनक दावा
1

Sanjay Raut PC: सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेची घाई का? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sharad Pawar PC News: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत माहिती नाही…; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2

Sharad Pawar PC News: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत माहिती नाही…; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar Death: “दादा बायरोड पुण्याला जाणार होते, पण…”; अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? चालकाने सांगितला ‘तो’ थरार
3

Ajit Pawar Death: “दादा बायरोड पुण्याला जाणार होते, पण…”; अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? चालकाने सांगितला ‘तो’ थरार

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!
4

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.